शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 08:07 IST

ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

शिर्डी : सरकारची हाताळणी चुकते आहे. थापा मारणारे हे सरकार निर्घृण, निर्दयी व तिडवाकडं आहे. गद्दारी करून आमचे सरकार पाडले असले तरी जनतेला सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही. सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी. अशी परिस्थिती सध्या असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत केली. शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांप्रमाणे तत्काळ नुकसान भरपाई द्या, वीज बिले माफ करा, अशी सरकारकडे मागणी करत ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यानंतर साईंचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवेळी अस्मानी नाही तर राजकारणाची सुलतानी शेतकऱ्यांना रडवतेय. मागील वर्षी अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आतादुष्काळाचे पंचनामे कधी होतील व भरपाई कधी मिळेल, असा सवाल उपस्थित करतानाच एक रुपयात विमा हे थोतांड असल्याचा व विमा कंपन्यांच्या फायद्याचा व्यवहार सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

मी भारावून गेलो...आज काकडी येथे एका मुलाने शिदोरी दिली. याबाबत ठाकरे म्हणाले, शिदोरीमुळे मी भारावून गेलो. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल पक्ष व वडील चोरले; पण जनता आणि आई-वडिलांचा आशीर्वाद आजही सोबत आहे. आपण ही शिदोरी खाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेshirdiशिर्डीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी