खरीपाचे दु:ख विसरून अखेर आता शेतकरी लागला रब्बीच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 08:42 PM2019-11-19T20:42:01+5:302019-11-19T20:42:45+5:30

खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या खरीप पिकाचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. त्याचे शेतकऱ्याला मोठे दु:ख झाले आहे. परंतु आता पाऊस उघडल्याने आणि शेतातील पाणी कमी होऊन जमीन सुकल्याने हे दु:ख बाजूला ठेवून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

Forgetting the kharif misery, the farmer is now ready for the rabbi | खरीपाचे दु:ख विसरून अखेर आता शेतकरी लागला रब्बीच्या तयारीला

खरीपाचे दु:ख विसरून अखेर आता शेतकरी लागला रब्बीच्या तयारीला

Next
ठळक मुद्देआता रब्बीसाठी जमीन तयार करायची आहे.

खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या खरीप पिकाचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. त्याचे शेतकऱ्याला मोठे दु:ख झाले आहे. परंतु आता पाऊस उघडल्याने आणि शेतातील पाणी कमी होऊन जमीन सुकल्याने हे दु:ख बाजूला ठेवून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.
चालू वर्षी सुरवातीच्या अल्पशा पाऊसावर शेतकºयाने खरीप पिकाचे पेरणी केली होती. यात मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली होती. खरीप हंगामातील मका हे पीक शेतकºयाच्या दृष्टीने महत्वाचे पीक असते. कारण या पिकाच्या उत्पनातून तो रब्बी पिकासाठी उन्हाळी कांदाच्या लागवडीसाठी खर्च करतो.
या पैशातून कांद्यासाठी जमीन तयार करणे, कांदा लागवडीच्या व काढणीचा खर्च मजुराची मजुरी, कांदा पिकासाठी खते, औषधे यासाठी करतो. चालू या पिकावर सुरवातीपासून लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. तेव्हा शेतकºयाने महागडी अशी औषधाची फवारणी करून मकाचे पीक जगविले होते.
खरिपाची पिके तयार झाली होती. काही शेतकऱ्यांनी मका, बाजरी पिकाची कापणी केलेली होती. काही कापणी करण्याचा तयारीत होते. परंतु अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाला सुरु वात झाली.
हा अवकाळी पाऊस एवढा प्रचंड प्रमाणात होता की तो सतत पंधरा ते वीस दिवस सतत झाल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले.हे पाणी एक मिहन्याभर शेतात साचत राहिल्याने शेतातील कापणी केलेल्या मका व बाजरीच्या कणसांना कोंब फुटले.कापणी केलेला कडबा साचलेल्या पाण्यात राहिल्याने सडून गेला.तर शेतात उभे असंलेल्या पिकाचे मुळेवे पाण्यामुळे कुजून गेल्याने ती शेतात तिची होती.
खामखेडा परिसरात लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करतात. ज्या शेतकºयाचा विहिरींना लवकर पाणी उतरते ती शेतकरी लवकर लाल कांद्याची लागवड करतात. तेव्हा काही शेतकºयांनी लाल कांद्याची लागवड केलेली होती. तेव्हा लाल कांदा तयार झाला होता. आता कांद्याला चांगला बाजार असल्याने शेतकरी खुशीत होता. त्यामुळे त्याने कांदा पिकासाठी फार मोठी कसरत केली होती.
एक महिन्याचा कालावधी कांदा काढणी साठी होता. कांद्याला चांगला भाव मिळेल. आणि हाती चार पैसे जास्त मिळतील या आशेने शेतकरी कांदा पिकाकडे पाहून खुश होता. परंतु या अवकाळी पावसाने शेतकºयाचा आशेवर पाणी फेरले. पंधरा दिवस सारखा पाऊस पडत राहिल्याने या अवकाळी पाऊसाचे पाणी वाफ्यात साचून राहिल्याने तयार असलेला कांदा सडून गेला. त्यामुळे कांद्याचे पीक तयार करून आणि चांगला भाव असूनही शेतकºयाचा पदरात काहीच मिळाले नाही.
उन्हाळी कांद्याचे टाकलेली रोपे या पाऊसाने दाबून टाकल्याने तीही नशा झाली.तेव्हा शेतकर्याचा डोळ्यासोमोर त्याचे लाखो रु पयांचे नुकसान झाले.हे दु:ख शेतकरी एक मिहनाभर करत राहिला.शासन स्तरावरून काहीतरी भरीव मदत मिळेल.याची शेतकर्याला अपेक्षा होती.परंतु अगदी तूटपुंजी मिळाल्याने त्यातून काही होणार नाही .
आता हे दु:ख करत राहण्यापेक्षा हे सर्व दु:ख बाजूला करीत शेतकरी रब्बी पिकाच्या तयारीला लागला आहे. शेतातील पाणी कमी झाले आहे. शेतातील ओलावा सुकला आहे. जास्त पाण्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. कडबा शेतात पाण्याने कुजून सडला आहे. अजून काहींच्या शेतात मका, बाजरीचे पिके उभी आहेत. तेव्हा आता रब्बीसाठी जमीन तयार करायची आहे.
एक महिन्याभर शेतीची कामे बंद असल्याने आता सर्वत्र एकच दम कामे सुरू झाल्याने मजूर मिळत नाही. मजुरीचे दर वाढलेले आहेत. जवळ पैसा नाही. तेव्हा काही शेतकरी घरच्या घरी शेतीची कामे मुलांसह करतांना दिसून येत आहेत.
आता उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतकºयाजवळ शिल्लक नाही. आता रब्बी हंगामात कोणते पीक घ्यावे याचा विचार शेतकरी करीत आहे.

Web Title: Forgetting the kharif misery, the farmer is now ready for the rabbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.