शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

झाले गेले विसरा, आता पुढे काय करता येईल?

By admin | Updated: November 28, 2014 23:37 IST

राज ठाकरे : लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना घातली आर्त साद

नाशिक : ते आले, त्यांनी पाहिले अन् ते गेले या नेहमीच्या चित्राला फाटा देत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नाशिक दौऱ्याची सुरुवात लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकारी यांची वैयक्तिक भेट घेऊन व सविस्तर चर्चा करून, त्यातही विशेष म्हणजे सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेत भविष्यातील पक्ष बांधणीची वाटचाल निश्चित करण्याबाबत धोरण ठरविण्याच्या दिशेने पाउले उचलल्याचे चित्र होते.
जोरदार शक्तिप्रदर्शनाने स्वागत झाल्यामुळे राज ठाकरे यांनी अजूनही पक्षावर आपलीच पकड असल्याचे गुरुवारी दाखवून दिले होते. शुक्रवारी सकाळीही त्यांनी मनसेचे पक्ष कार्यालय राजगड येथे येऊन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांची वन टू वन चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने त्यांनी भविष्यात काय करता येईल, पक्ष संघटन मजबुतीसाठी काय केले पाहिजे, तुम्ही लोकांना भेटता काय, तुमच्या भागात वेगळा काय प्रकल्प तुम्ही राबवू शकता, महापालिकेतील सत्तेचा वापर करून भविष्यात पक्ष संघटन कसे बळकट करता येईल यावरच प्रामुख्याने भर दिल्याचे समजते. त्यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकासकामांच्या फाईली कशा अडकल्या आहेत, विकासकामांना निधीच नाही याकडे राज ठाकरे यांचे लक्ष वेधले. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत राज यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी महापौर अशोक मुतर्डक, माजी आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह सिडकोतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. दुपारनंतर त्यांनी थेट मुक्काम असलेल्या हॉटेल एक्स्प्रेस इन येथे काही निवडक लोकांशी चर्चा केल्याचे समजते. तसेच सायंकाळी उशिरा मनसे पदाधिकाऱ्याच्या नातलगाच्या विवाहाला हजेरी लावल्याचे कळते. (प्रतिनिधी)