फुलबाजार स्थलांतरावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:56 AM2019-11-12T00:56:04+5:302019-11-12T00:56:25+5:30

सराफ बाजारातील फुलबाजाराचे गणेशवाडीतील भाजी मंडईच्या जागेत स्थलांतर करण्यासाठी महापालिकेचे पथक गेल्यानंतर स्थलांतरित करण्यावरून विक्रेत्यातच दोन गट पडले आणि त्यातून झालेल्या हाणामारीत संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला टाके पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सोमवारी (दि.११) सकाळी हा वाद झाला.

 Flower Market Mobilization | फुलबाजार स्थलांतरावरून हाणामारी

फुलबाजार स्थलांतरावरून हाणामारी

Next

नाशिक : सराफ बाजारातील फुलबाजाराचे गणेशवाडीतील भाजी मंडईच्या जागेत स्थलांतर करण्यासाठी महापालिकेचे पथक गेल्यानंतर स्थलांतरित करण्यावरून विक्रेत्यातच दोन गट पडले आणि त्यातून झालेल्या हाणामारीत संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला टाके पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सोमवारी (दि.११) सकाळी हा वाद झाला. अर्थात, त्यानंतरही प्रशासन फुलबाजार स्थलांतरित करण्यावर ठाम असून, हा बाजार त्याचठिकाणी भरवला जाईल, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे.
सराफ बाजारात फुलबाजार अनेक वर्षांपासून भरत असला तरी फेरीवाला धोरणांतर्गत प्रशासनाने गणेशवाडीतील भाजी मंडईच्या वाहनतळाच्या जागेत स्थलांतर करण्याचे ठरविले आहे. गेल्या आठवड्यापासून अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. फुलविक्रेत्यांना स्थलांतरित केल्यानंतर सराफ बाजारात पोलीस आणि अतिक्रमण विरोधी पथकाचे ठाण मांडून असतात. दुपारपर्यंत असलेले हे पथक गेल्यानंतर फुलविक्रेते पुन्हा ‘जैसे थे’ त्याचठिकाणी येतात. तथापि, सोमवारी (दि.११) अधिक कठोर कारवाई करण्याचे प्रशासनाने ठरविले होते. त्यानुसार पथकाने सकाळीच कठोर कारवाई करीत फुलविक्रेत्यांना तेथे बसू देण्यास विरोध केला. स्थलांतरित होण्यास तयार असलेले आणि नसलेले यांच्यात त्यावरून वाद झाला. महापालिकेच्या वतीने भाजी मंडईच्या वाहनतळाच्या जागेत नको तर मंडईतच जागा द्यावी तसेच जोपर्यंत मंडईत सर्व सुविधा दिल्या जात नाही तोपर्यंत महापालिकेने कोणतीही कारवाई करू नये, अशी संदीप शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची मागणी होती, मात्र दुसरा गट ते ऐकण्यास तयार नव्हता. त्यावरून फुलबाजारातच वातावरण हातघाईवर आले. त्यातून झालेल्या हाणामारीत शिंदे यांना प्रचंड मार बसल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
दरम्यान, महापालिकेने याठिकाणी असलेला फुलबाजार स्थलांतरित केल्यानंतर तो बाजार तेथेच राहील, अशी भूमिका घेतल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली विक्रेत्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी फुलबाजारातील विक्रेत्यांचे भाजी मंडईच्या जागीच स्थलांतर करण्याची तसेच भाजी मंडईत विक्रेत्यांना सर्व सुविधा देऊनच त्यांना स्थलांतरित करावे, अशी भूमिका घेतली, परंतु आयुक्तांनी असमर्थता व्यक्त केली. महापालिकेच्या वतीने ही कारवाई सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट केले.
जागेचा वाद : एक फुलविक्रेता जखमी; तिघे ताब्यात
फुलबाजारात फुलविक्रीचा व्यवसाय क रण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांच्या हाणामारीत झाले. या घटनेत एक फुलविक्रेता जखमी झाला असून, सरकारवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
फुलविक्र्रीसाठी थांबण्यास विरोध केल्याच्या कारणावरून विक्रेत्यांचे परस्परविरोधी गटातील काही विक्रेते समोरासमोर आले. जखमी संदीप दत्तात्रय शिंदे (४७, रा. शिंदे मळा, गणेशवाडी) यांच्या फिर्यादीनुसार संशयित सतीश बाबुराव गायकवाड व त्यांच्या पाच साथीदारांनी मिळून शिंदे यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते जखमी झाल्याने त्यांच्या मित्राने शिंदे यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी संशयितांविरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कृष्णकुमार ऊर्फ सतीश एकनाथ गायकवाड, गणेश रघुनाथ डोके (४२) तन्मय गणेश डोके (२५) या फुलविक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक डी. वाय. पवार हे करीत आहेत.
मनपाच्या वतीने २०१५ मध्ये फुलविक्रेत्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे करण्यात आला. त्यात ४३ जणांनी सहभाग घेतला. त्यामुळे मंडईच्या वाहनतळाच्या जागेत स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर अनेक विक्रेत्यांची संख्या वाढली. त्यांना अन्यत्र जागा देण्याबाबत विचार करण्यात येईल. काही विक्रेत्यांनी भाजी मंडईची जागा मागितली. परंतु या जागेसाठी लिलाव करण्यात येईल त्यात त्यांनी सहभागी व्हावे, असे त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.
- राधाकृष्ण गमे, आयुक्त महापालिका

Web Title:  Flower Market Mobilization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.