वणीच्या देवनदीला पुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:47 IST2020-06-15T13:47:28+5:302020-06-15T13:47:59+5:30
वणी : सप्तशृंग गडावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पर्वतरांगावरील पाण्याचा प्रवाह भातोडे गावातील नदीमार्गे वणीच्या देवनदीला येऊन मिळाल्याने देवनदीला पुर आला आहे.

वणीच्या देवनदीला पुर
वणी : सप्तशृंग गडावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पर्वतरांगावरील पाण्याचा प्रवाह भातोडे गावातील नदीमार्गे वणीच्या देवनदीला येऊन मिळाल्याने देवनदीला पुर आला आहे. वणी व परिसरात पावसाने हजेरी लावली मात्र सप्तशृंगगड व पर्वतरांगांमधे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.हे पाणी पर्वतरांगाच्या तळाला जाऊन भातोडे व लगतच्या नदीपात्रात गेले. हे पाणी देवननदीत गेले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कोरडीठाक असलेली देवनदी भरभरु न वाहु लागली आहे. दरम्यान सदरचे पाणी वणी सापुतारा रस्त्यावरील पुलाखालुन वाहु लागले. त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ पाण्याबरोबर दिसू लागला. पाण्याच्या प्रवाहामुळे खंडेरावनगरमधील रहिवाशी सतर्क झाले होते.