शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरून करावा लागतो जीवघेणा प्रवास

By admin | Updated: October 23, 2016 22:48 IST

गोदावरी : बंदी असूनही अवजड वाहनांची ये-जा सुरूच

सायखेडा : येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या कठड्यावरील संरक्षक पोल पाऊस बंद होऊन दोन महिने उलटले असले तरी अद्याप उभे न केल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आलेला असताना पुलावरून वेगात पाणी वाहून जावे, कचरा अडकून पुलाला धोका निर्माण होऊ नये म्हणून पोल खाली केले होते. इतके दिवस होऊनही पोल ‘जैसे थे’ असल्याने ते तत्काळ उभे करावे, अशी मागणी होत आहे.रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर सावधगिरी म्हणून गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी मोठी वाहने जाऊ नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला पिलर उभे करून ठरावीक उंचीवर आडवी कमान उभी करण्यात येणार होती. संबंधित विभागाने फक्त दोन्ही बाजूला पिलर उभे केले पण वरील बाजूला कमान उभी न केल्याने बसशिवाय इतर सर्व प्रकारची वाहने सर्रासपणे चालू आहे. त्यामुळे दुर्दैवाने काही घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. गोदावरीला आलेल्या महापुरानंतर जुनाट झालेल्या तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सायखेडा येथील पुलाजवळ बांधकाम विभागाने पूल कमकुवत असून, अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचा बोर्ड लावला आहे; मात्र प्रशासनाच्या या सूचनेची दखल फक्त महामंडळाच्या बसेसनेच घेतली असल्याचा सूर जनसामान्यांत उमटतो आहे. कारण इतर अवजड वाहने टेम्पो, ट्रक आदि सर्रास त्यावरून ये-जा करतात आणि बसेस मात्र पुलाच्या जवळ येऊनच थांबत असल्याने नागरिकांची, विद्यार्थी वर्गाची व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. त्यामुळे गोदाकाठ भागातील अनेक गावांना बसचे दर्शन होत नाही. उच्च शिक्षण व नोकरीकरता ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक येत असतात. मोठी बस येऊ शकत नसली, तरी पुलावरून मिनी बसेस जाऊ शकत असल्याने त्या बसेसची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी करत आहेत. (वार्ताहर)