शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील महिन्यात ध्वजावतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 23:21 IST

त्र्यंबकेश्वर : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येणार

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजावतरण सोहळ्याप्रसंगी भारतातील विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रिय मंत्री जन. व्हि.के.सिंग तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सन २०१४-१५ मध्ये संपन्न झाला. तथापि कुंभपर्वकाल १३ महिन्यांचा होता. दि. १४ जुलै २०१५ रोजी सिंहस्थास पहाटे प्रारंभ झाला होता. या दिवशी गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाला होता. तर दि. ११ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री ९.०० ते ९.३० दरम्यान सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार असल्याने सिंहस्थाची समाप्ती होणार आहे. म्हणून या दिवशी सिंहस्थ ध्वजावतरण होणार आहे.ध्वजावतरण सोहळा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व त्र्यंबक नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. पाहुण्यांना निमंत्रण वगैरे देण्यासाठी पुरोहित संघाचे पदाधिकारी, त्र्यंबक नगर पालिकेचे पदाधिकारी व देवस्थानचे विश्वस्थ मंडळ संयुक्त प्रयत्न करीत आहेत. या ध्वजावतरण सोहळ्यासाठी अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक श्रीमहंत हरिगिरीजी महाराज, श्रीमहंत शंकरानंद सरस्वती (भगवानबाबा) या बरोबरच त्र्यंबकेश्वरमधील सर्व अखाड्यांचे प्रमुख ठाणापती महंत उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबक नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा, संतोष कदम, धनंजय तुंगार, दिपक लढ्ढा, सुनिल अडसरे तसेच सर्व पालिका पदाधिकारी, मुख्याधिकारी चेतना केरुरे (मानूरे) सर्व नगरसेवक, पुरोहित संघ व विश्वस्थ मंडळ जय्यत तयारी करीत आहेत. (वार्ताहर)