शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार उद्योग सुरू; पन्नास हजार कामगार कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:10 IST

सातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, पन्नास हजाराच्या आसपास कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.

गोकुळ सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, पन्नास हजाराच्या आसपास कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या २३ मार्चपासून ते १४ एप्रिलपर्यंत आणि दुसºया टप्प्यात ३ मेपर्यंत आणि आणि आता १७ मेपर्यंत केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. दरम्यान, २० एप्रिलपर्यंत उद्योगधंदे पूर्णपणे बंद ठेवून कामगारांना सुटी देण्यात आली होती. २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जिल्ह्यातील उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. जवळपास सहा हजारांच्या आसपास उद्योगांपैकी पाच हजारांवर उद्योगांना अटी-शर्तीनुसार रीतसर परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला परवानगी देताना कडक निर्बंध लादण्यात आले होते. कामगारांना ने-आण करण्याची जवाबदारी त्या त्या आस्थापनांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार बºयाच उद्योगांनी ही जबाबदारी पार पाडली. परंतु मोठ्या उद्योगांना ने-आण करणे शक्य नसल्याने त्यांनी परवानगी घेतली नव्हती. जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागतील. जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर उद्योग सुरू झाले असून, ५० हजारांवर कामगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. पूर्ण ताकदीने उत्पादन प्रक्रिया सुरू झाली नसली तरी हळूहळू उद्योगांची चाके गतिमान होणार आहेत.---४जिल्ह्यातील सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, येवला, कळवण, नांदगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, वाडीवºहे, गोंदे, माळेगाव, मुसळगाव या औद्योगिक वसाहतीतील सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे असे दहा हजारांच्यावर उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये एक लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात. त्यात रोजंदारीवरील आणि कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाउनच्या काळात या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.--------४महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस, हिंदुस्थान ग्लास, ग्राफाईट इंडिया, निलय ग्रुप, एमएसएस इंडिया, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र इगतपुरी, मायलॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्हज यांसह मोठ्या कारखान्यांनी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास हजारावर कामगारांना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामावर बोलावण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक