शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 18:18 IST

मालेगाव शहर परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पवारवाडी पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन अटक केली आहे. त्यांच्या कडून तलवार, चाकू, मिरची पावडर, रॉड, दोरी आदि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले

मालेगाव : शहर परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पवारवाडी पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन अटक केली आहे. त्यांच्या कडून तलवार, चाकू, मिरची पावडर, रॉड, दोरी आदि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहर परिसरात पाच जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले व पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेलसमोरील टेकडीलगत सराईत गुन्हेगार मोहंमद शहेबाज मोहंमद युसुफ उर्फ कमांडो रा. गोल्डननगर, बिलाल अहमद मोहंमद अजमल अन्सारी रा. बाग-ए-मोहंमद, राशीदअली कासमअली उर्फ पोली रा. रजापुरा चौक, मुशीरअली नुरअली रा. जाफरनगर, शहेबाज अहमद अब्दूल हाफीज रा. गोल्डननगर हे पाचही जण दुचाकी लावून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. यावेळी पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल, पोलिस हवालदार जनार्दन खैरनार, विनायक जगताप, दिपक फुलमाळी, महेंद्र पारधी, हितेश भामरे, मयुर भावसार, अतुल पवार आदिंच्या पथकाने छापा टाकला. पोलीस आल्याचे बघून पाचही जणांनी पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन पाचही जणांना अटक केली. त्यांच्याकडून एक तलवार, तीन चाकू, एक चायनिज चॉपर, मिरची पावडर, दोन लोखंडी रॉड, दोरी, मोबाईल, दोन दुचाकी आदि दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार मोहंमद शहेबाज मोहंमद युसुफ उर्फ कमांडो याच्यावर यापूर्वी देखील दहशत माजविणे, दरोड्याचा प्रयत्न आदि गुन्हे दाखल आहेत. शहरातील गुन्हेगारीचे मुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर आहे. जमिन फसवणूक, सायझिंग व यंत्रमागधारकांना काही जणांकडून खंडणीच्या धमक्या दिल्या जात आहेत. संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. १३ गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. पत्रकार परिषदेला पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे, पवारवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आदि उपस्थित होते.पवारवाडी पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घेतल्यानंतर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. तरूणांना व्यसनाच्या आहारी नेणाºया कुत्ता गोळीच्या तीन छापे त्यांनी टाकले आहेत. तसेच एक गावठी कट्टा, एक जीवंत काडतुस, देशीदादा खून प्रकरणातील संशयितांना अटक, संशयित गुन्हेगारांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या पाचही सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पवारवाडी पोलिसांना यश आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMalegaonमालेगांव