रेल्वे ट्रॅक्शन परिसरातून पाच चंदनवृक्षांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 14:42 IST2018-08-12T14:36:20+5:302018-08-12T14:42:28+5:30
नाशिक : चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरणाऱ्यांची टोळी शहरात कार्यरत झाली आहे़ या टोळीने एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना घडली आहे़

रेल्वे ट्रॅक्शन परिसरातून पाच चंदनवृक्षांची चोरी
नाशिक : चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरणाऱ्यांची टोळी शहरात कार्यरत झाली आहे़ या टोळीने एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना घडली आहे़
आडगाव नाक्यावरील महाराष्ट्र कॉलनीतील रहिवासी संजय सनस यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि़६) सायंकाळी साडेसहा ते मंगळवारी (दि़७) सकाळी साडेसात या कालावधीत एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन अंगणातील पाच चंदनाची वृक्ष तोडून त्यातील सुवासिक खोड चोरून नेले़ सनस यांच्या आॅफीससमोरील तसेच बंगला नंबर ५०, ४०६ व ४०७ च्या कंपाऊंडमध्ये ही चंदनाची झाडे होती़
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचागुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या चंदनचोरी करणाºया टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़