शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 02:00 IST

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.मनमाड येथे दोघांचा मृत्यूमनमाड येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एसटी स्टँडजवळ असलेल्या वसाहतीत कृष्णा गोसावी यांनी घरगुती वादाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य घटनेत जावेरीया खान या नऊवषीर्य मुलीचा नदीवरील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. चॉँदशाहवली दरगाहजवळ ही घटना घडली.व्यावसायिकाचा मृत्यूअज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना सटाणा येथे रविवारी (दि.२५) घडली. नामदेव निवृत्ती कुमावत (५२) असे अपघातातील मृताचे नाव आहे. कुमावत मॉर्निंग वॉकसाठी गेले असता नामपूर रस्त्यावरील बागलाण अकॅडमीलगत अज्ञातवाहनाने त्यांना जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.मुलाचा बुडून मृत्यूजोरण येथील दिनेश पोपट माळी (१ १) याचा गावाजवळील हत्ती नदीवरील बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. पाचव्या इयत्तेत शिकणारा दिनेश मित्राबरोबर अंघोळीसाठी बंधाºयावर गेला होता. खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. तो बुडत असताना त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र परिसरात कुणीही नव्हते. आदिवासी वस्तीवर मोजमजुरी करणारे पोपट माळी यांचा दिनेश हा एकुलता एक मुलगा होता. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.उपसरपंचांचा अपघाती मृत्यूलोणारवाडी गावाजवळील गतिरोधकावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातात लोणारवाडीचे उपसरपंच ज्ञानेश्वर विष्णू गोळेसर (५२) यांचा मृत्यू झाला. गोळेसर हे कारने (क्र. एमएच १५ डीएम १९०७) जात असताना दुसरी कार (क्र. एमएच ४२, बीके ९५००) यांच्यात भीषण धडक झाली. अपघातात ज्ञानेश्वर गोळेसर यांची प्राणज्योत मालवली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू