पाच नवनिर्वाचित चढले पहिल्यांदाच विधानसभेची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:56 AM2019-11-28T00:56:12+5:302019-11-28T01:00:07+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करत निवडून आलेल्या जिल्ह्यातील पाच नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी (दि.२७) पद व गोपनीयतेची शपथ घेत पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढली. या पाच पैकी नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार राहुल ढिकले वगळता अन्य चार आमदार सरोज अहिरे, नितीन पवार, सुहास कांदे आणि हिरामण खोसकर हे सत्ताधार बाकावर दिसणार आहेत.

Five newly-elected MLAs step up for the first time | पाच नवनिर्वाचित चढले पहिल्यांदाच विधानसभेची पायरी

पाच नवनिर्वाचित चढले पहिल्यांदाच विधानसभेची पायरी

Next
ठळक मुद्देशपथविधी : ढिकलेवगळता अन्य चार आमदार सत्ताधारी बाकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करत निवडून आलेल्या जिल्ह्यातील पाच नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी (दि.२७) पद व गोपनीयतेची शपथ घेत पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढली. या पाच पैकी नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार राहुल ढिकले वगळता अन्य चार आमदार सरोज अहिरे, नितीन पवार, सुहास कांदे आणि हिरामण खोसकर हे सत्ताधार बाकावर दिसणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला लागल्यानंतर गेल्या महिनाभरापासून राजकीय नाट्य रंगले होते. या राजकीय घडामोडींमुळे विधानसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांचा शपथविधी लांबला होता. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर जिल्ह्यातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
अखेर राजकीय रंगमंचावर सत्तानाट्याची तिसरी घंटा वाजली आणि राजकीय अनिश्चिततेवर पडदा पडत बुधवारी अखेर सर्व निर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. १५ पैकी ५ आमदार विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. या आमदारांनी बुधवारी पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढत सभागृहाची नवलाई अनुभवली. जिल्ह्यातून देवळाली मतदारसंघातून राष्टÑवादीच्या सरोज अहिरे यांनी तीन दशकांपासून असलेली घोलप कुटुंबीयांची सद्दी संपुष्टात आणत इतिहास घडविला आहे. सरोज अहिरे या महापालिकेत भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु, जागा वाटपात देवळालीची जागा सेनेलाच सोडण्यात आल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत ऐनवेळी राष्टÑवादीचे बोट धरले आणि त्यांनी आमदार योगेश घोलप यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. नाशिक पूर्व मतदारसंघातही मनसेतून भाजपत दाखल झालेल्या अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी आमदार बाळासाहेब सानप यांचा पराभव करत पहिल्यांदाच विधानसभा गाठली.
सानप यांचे भाजपने ऐनवेळी तिकीट कापल्याने ढिकले यांनी भाजपचे कमळ हाती घेत विजय संपादन केला. कळवण मतदारसंघात माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी दीर्घकाळ आमदारकी उपभोगणारे माकपचे जे. पी. गावित यांचा पराभव करीत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला तर नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास कांदे हे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र व दोन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे पंकज भुजबळ यांचा पराभव करत जायंट किलर ठरले.
इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेकडून उमेदवारी करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टÑवादीतून कॉँग्रेसची वाट धरलेल्या हिरामण खोसकर यांनी पराभव
केला. त्यामुळे गावित यांची विधानसभेत जाण्याची हॅट्ट्रीक हुकली. विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या या पाचही सदस्यांनी मातब्बरांना पराभवाची धूळ चारली. आता महाविकास आघाडी सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याने या पाचपैकी भाजपचे राहुल ढिकले वगळता राष्टÑवादीच्या सरोज अहिरे व नितीन पवार, शिवसेनेचे सुहास कांदे व कॉँग्रेसचे हिरामण खोसकर हे सत्ताधारी बाकावर दिसणार आहेत.अन्य सदस्यांचा शपथविधीजिल्ह्यातील राष्टÑवादीचे हेवीवेट नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे माजी मंत्री दादा भुसे हे सलग चौथ्यांचा विधानसभेवर निवडून गेले आहेत. याशिवाय, सिन्नरमधून राष्टÑवादीचे माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीतून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ हे तिसऱ्यांदा तर निफाडचे राष्टÑवादीचे दिलीप बनकर, चांदवडचे भाजपचे डॉ. राहुल अहेर, बागलाणचे भाजपचे दिलीप बोरसे, मालेगाव मध्यचे एमआयएमचे मौलाना मुफ्ती मोह्मम्मद, नाशिक पश्चिमच्या भाजपच्या सीमा हिरे आणि नाशिक मध्यच्या भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे हे सदस्य दुसºयांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. या आमदारांनीही बुधवारी पदाची शपथ घेतली. यामधील छगन भुजबळ आणि दादा भुसे यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित मानले जात आहे.

Web Title: Five newly-elected MLAs step up for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.