शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

शहरातून पाच दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:06 AM

गेल्या आठवड्यात चोरीच्या दुचारीकवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स लुटण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार ताजाच असताना नाशिक शहर व परिसरातून आणखी पाच दुचाकींची चोरी झाली आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यात चोरीच्या दुचारीकवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स लुटण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार ताजाच असताना नाशिक शहर व परिसरातून आणखी पाच दुचाकींची चोरी झाली आहे. अशा चोरीच्या वाहनांचा वापर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये होत असल्याचे यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समोर आलेले असताना शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, वाहन चोरट्यांवर नियंत्रण मिळविण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांत अंबड, रविवार कारंजा आणि देवळाली कॅम्प परिसरातून पाच दुचाकी वाहनांची चोरी झाल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहेत. सातपूर-अंबड लिंकरोडवरील जयेश पार्क येथील राहुल दोंदे यांच्या घरासमोरील ओट्यावर पार्किंग केलेली एम १५ इक्यू ७८१० ही ५० हजार रुपये किमतीची काळ्याची रंगाची दूचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक शेळके या प्रकरणाता तपास करीत आहेत, तर सिडकोतील उत्तमनगर येथील महात्मा फुले चौकातील जगनसिंह झाला यांची एमएच १९ बीआर ५८०२ क्रमांकांची काळ्या रंगाची दुचाकी अज्ञातांनी चोरली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार खांडेकर या चोरीचा तपास करीत आहेत. तिसरी घटना सातपूर-अंबड लिंक रोडवरील संजीवनगर, जाणता राजा चौक येथे घडली आहे. येथील आकाश प्रभाकर गिलबिले यांची घरासमोरील पार्किंग केलेली एमएच१५ डीटी ०६८६ काळ्या रंगाची ५० हजार किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या चोरीप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शेळके तपास करीत आहेत, तर चौथी दुचाकी रविवार कारंजा येथील तेली गल्लीतील गोदावरी संकुल येथून चोरीला गेली आहे. तेल्लीगल्लीतील शेखल नाळेगावकर यांची दुचाकी क्रमांक एमएच १५ बीएल ८४९६ क्रमाकांची काळ्या रंगाची हिरो होंडो स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. के. गुंजाळ या चोरीचा तपास करीत आहे. पाचव्या दुचाकीची चोरी देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूल साउथरोड येथून झाली आहे. या ठिकाणाहून ज्ञानेश्वर पाळदे (३०) यांची एमएच १५ इआर २९७४ क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञान चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील वाढत्या दुचाकींच्या चोरीला पोलिसांची निष्क्रियता जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच उरला नसल्याने मोकाट सुटलेल्या चोरट्यांकडून अशाप्र्रकारे दुचाकीचोरी, घरफोडीसारखे गुन्हे सºहास सुरू असल्याची टीका पोलिसांनीवर होऊ लागली आहे.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी