शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्याच्या तान्हुलीचा विहिरीत फेकून खून

By admin | Updated: September 6, 2016 00:23 IST

दिंडोरी तालुक्यातील घटना : पोळीभाजी मागण्याचा बहाणा

वणी/पांडाणे : जेवणासाठी भाजीपोळी मागण्याचे निमित्त करून घरातील अवघ्या पाच महिन्यांच्या तान्ह्या मुलीला घरातून उचलून शेतातील विहिरीत फेकून तिचा खून केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील दहेगाव शिवारात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी दोन अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. दिंडोरी तालुक्यातील दहेगाव शिवारात ज्ञानेश्वर तुकाराम मेधणे यांची शेतजमीन असून, शेतीत त्यांचे वास्तव्य आहे. दुपारी पाऊणच्या सुमारास दोन अज्ञात इसम मेधणे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले. घरात असलेल्या वंदना मेधणे यांच्याकडे त्यांनी जेवणासाठी भाजीपोळी मागितली. वंदना भाजी पोळी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता त्या संशयितांनी घरात असलेल्या पाच महिन्याच्या स्वरा मेधने या तान्हुलीला उचलले व बाहेर आले आणि जवळच असलेल्या विहिरीत तिला फेकून दिले. दरम्यान भाजीपोळी घेऊन वंदना मेधने आल्या असता दोघे संशयित दुचाकीवर बसून निघून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यांनी स्वराचा शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही . संशयावरून घरालगत असलेल्या विहिरीत डोकावले असता स्वरा विहिरीत आढळून आली. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. स्वराला विहिरीबाहेर काढून वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले डॉ. राजेंद्र बागुल यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. नाकातोंडात पाणी गेल्याने स्वराचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शव विच्छेदन अहवालात काढण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पोलीस निरीक्षक अनंत तारगे, पोलीस उपनिरिक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनाक्र म पाहता संवेदनशील बाब असल्याने स्थानिक गुन्हा शाखेची मदत घेऊन प्रकरणाच्या तळाशी जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी दिली. दरम्यान अतिरीक्त पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाचे गांभीर्य बघून सखोल चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. ज्ञानेश्वर मेधणे यांच्या तक्र ारीवरून दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)