शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

पाच अटकेत : सीमावर्ती नाक्यावर ३२ किलो गांजा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 2:35 PM

गोण्या उघडून तपासल्या असता यामध्ये गांजासारखा अंमली पदार्थाचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ३२ किलो गांजासह १६ हजारांची रोकड, ४ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार असा एकूण

ठळक मुद्देआडगाव पोलिसांची कारवाई९ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : धुळे बाजूकडून शहरात एका मोटारीतून गांजा या अंमली पदार्थाची होणारी वाहतूक रोखण्यास आडगाव पोलिसांना यश आले. ९वा मैल येथे एक संशयित पांढऱ्या रंगाची स्विफ्ट मोटार अडविली असता त्या मोटारीच्या डिक्कीतून सुमारे ३२ किलो वजनाच्या दोन गोण्या भरून गांजा वाहून नेला जात असल्याचे आढळून आले. या गुन्ह्यात चालकासह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.शहर पोलीस आयुक्तालयाच्या ९वा मैल सिमावर्ती नाक्यावर आडगाव पोलिसांनी नाकाबंदी कठोर करत शनिवारी (दि.११) मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे वाहनांची झडती घेण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख हे गुन्हे शोध पथकासह सीमावर्ती नाक्यावर थांबले. यावेळी वरील वर्णनाची मोटार येताच ती पोलिसांनी अडविली आणि चालकासह त्यामध्ये बसलेल्या इसमांना खाली उतरण्यास सांगितले असता त्यांनी उतरून पळ काढण्यास सुरूवात केली.

यावेळी बंदोबस्तावरील पथकाने चालकाला जागीच पकडले तर उर्वरित पळून जाणाºया चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ‘अप्पांचा आशिर्वाद’ असे दर्शनी भागावर लिहिलेल्या वाक्यामुळे कार ओळखणे पोलिसांना सोपे झाले. पांढºया रंगाच्या स्विफ्ट डिझायर (एम.एच१८ एजे २१२३) मोटारीची पोलिसांनी झडती घेतली असता पाठीमागील बाजूस डिक्कीत प्लॅस्टिकच्या दोन गोण्या आढळून आल्या. या गोण्या उघडून तपासल्या असता यामध्ये गांजासारखा अंमली पदार्थाचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ३२ किलो गांजासह १६ हजारांची रोकड, ४ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार असा एकूण ९ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या पाचही संशयितांविरूध्द अंमली पदार्थाची अवैध वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरिक्षक एस.डी.बिडगर हे करीत आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी