शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीच्या डब्यांना आग

By admin | Updated: January 9, 2017 01:05 IST

नांदगाव : बोग्यांवर पाण्याचा मारा करून आगीचा धोका टाळला


 नांदगाव : नांदगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ३ वर रविवारी (दि. ८) पहाटे ४ वाजेदरम्यान एकलहरे वीज निर्मिती केंद्राकडे जाणाऱ्या (कोळसा वाहून नेणाऱ्या) मालगाडीच्या तीन डब्यांना आग लागल्याने धावपळ उडाली. वेळीच आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
स्टेशनवर पॉर्इंटमन ताराचंद बोरसे यांना स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीच्या कोळसा भरलेल्या बोगीतून धूर बाहेर येत असल्याचे दिसले. त्यांनी स्टेशन उपप्रबंधक अवदेशकुमार यांच्याकडे धाव घेऊन माहिती दिली. रेल्वे पोलीस नरेंद्र पाडवी, योगेश बोरसे यांनी अग्निशमनबंबासाठी नगरपालिकेत संपर्क साधला असता येथील बंब उपलब्ध होणार नाही, असे पालिका कर्मचारी राजू पाटील व गोसावी यांनी माहिती दिल्यावरून मनमाड पालिकेच्या बंबाला तातडीने पाचारण करण्यात आले. दरम्यान, रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याच्या नळावरून प्लॅस्टिक पाइपने धूर येत असलेल्या ठिकाणी पाणी मारायला सुरुवात केली. लक्षात आलेला १३ नंबरचा डबा उष्णतेने लाल होऊ लागला होता. त्याचवेळी १४ व १८ नंबरच्या डब्यांमधून धूर येऊ लागल्याचे दिसले. ८ वाजता मनमाडचा बंब घटनास्थळी पोहोचला. मालगाडीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने आगग्रस्त रेल्वे गाडीला स्टेशनमधून १०० मीटर पुढे चालविण्यात आले तेव्हा कुठे १३ नंबरचा डबा बंबाच्या पाणी मारण्याच्या रेंजमध्ये आला.
सुरक्षेच्या कारणासाठी, आग विझविताना मुंबईकडे जाणाऱ्या लोहमार्गावरील ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) वीज बंद करण्यात आली होती. सदर २० किमीच्या विभागात एकही गाडी थांबविण्यात आली नव्हती. त्यानंतर अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तीनही बोग्यांवर पाण्याचा मारा करून आगीचा संभाव्य धोका टाळला. स्टेशन प्रबंधक अमरचंद अग्रवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आग विझविण्याची संपूर्ण प्रक्रिया
सुलभरीतीने पार पाडली. रेल्वेपोलीस शिवाजी इघे, मनमाड अग्निशामक दलाचे जॉर्ज स्वामी,
रवींद्र बगाडे, सुभाष बोडखे, रामलाल डिंबर, तुषार पांडे, महेंद्र गायकवाड यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. (वार्ताहर)