Fire at Nashik Municipal Corporation headquarters | नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग

नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग

नाशिक-  महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन मधील शिवसेना गटनेता कार्यालयाला आता  अचानक आग लागली असून ती विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शरणपूर रोडवर असलेल्या राजीव गांधी भवनात पहिल्या मजल्यावर शिवसेना गटनेता विलास शिंदे यांचे कार्यालय आहे. काही वेळापूर्वी शॉर्टसर्किटने या केबिनला आग लागल्याचे वृत्त आहे घटनेची माहिती करतात अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

सुरक्षिततेचा भाग म्हणून महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर बाहेर काढण्यात आला आहे तसेच संगणक आणि साहित्य सर्व प्रकारचे साहित्य बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यत्र भडकली नसली तरी ती तातडीने विझवावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत सध्या राजीव गांधी भवन मध्ये बघ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. आज शुक्रवार म्हणजेच कामाचा दिवस असल्याने मुख्यालयात काम करणारे सुमारे चारशे ते पाचशे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत.

Web Title: Fire at Nashik Municipal Corporation headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.