भरवीर शिवारात धावत्या कारला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:55 IST2019-02-18T18:55:25+5:302019-02-18T18:55:47+5:30
चांदवड : तालुक्यातील भरवीर शिवारात धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने सदर कार आगीत जळून खाक झाली.

भरवीर शिवारात धावत्या कारला आग
इम्रान शेख गुलाब शेख (रा. वडाळा नाका नाशिक) हे आपल्या कारने (क्र. एमएच ०३ सीएच २९५५) मनमाड येथे रेल्वे स्टेशनला प्रवासी सोडून चांदवड मार्गे नाशिककडे परतत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भरवीर शिवारात सिध्दिविनायक पेट्रोलपंपानजीक आले असता गाडीतून अचानक धूर निघून वायरी जळाल्या. हा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने तातडीने गाडी थांबवून ते गाडीबाहेर उतरले. थोड्याच वेळात कारने पूर्णपणे पेट घेतला. चांदवडचे सोमा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कार खाक झाली होती. यात गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. चांदवड पोलिसांनी अकस्मात घटनेची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार बापू चव्हाण करीत आहेत.