घराला आग लागून वृद्धेचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:31 IST2017-12-20T23:34:33+5:302017-12-21T00:31:07+5:30

इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे बुधवारी (दि. २०) सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, आगीची माहिती समजताच घोटी टोलनाक्याच्या अग्निशामक बंबांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत घर बेचिराख झाले होते.

Fire in the house and death due to old age | घराला आग लागून वृद्धेचा होरपळून मृत्यू

घराला आग लागून वृद्धेचा होरपळून मृत्यू

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे बुधवारी (दि. २०) सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, आगीची माहिती समजताच घोटी टोलनाक्याच्या अग्निशामक बंबांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत घर बेचिराख झाले होते.  घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल पुरे, घोटीचे सहायक पोलीस निरीक्षम पंकज भालेराव, उपनिरीक्षक आनंदा माळी, हवालदार धर्मराज पारधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे केले.  खैरगाव येथील शिदवाडीमधील काळू सोमा शिद हे आपल्या कुटुंबासह राहतात. ते आपल्या मुलासह गावाजवळील शेतावर राहतात, तर वाडीत असलेल्या घरात त्यांची पत्नी भीमाबाई काळू शिद (६५) राहत होत्या. बुधवारी सकाळी या घराला अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करीत संपूर्ण घराला वेढा घातल्याने घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत भीमाबाई या वृद्धेचा होरपळून मृत्यू झाला.

Web Title: Fire in the house and death due to old age