नाशिकच्या धुमाळ पॉईंट येथील कपड्याच्या दुकानाला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:02 IST2021-05-16T13:01:12+5:302021-05-16T13:02:07+5:30
या आगीमुळे कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानातील कपड्यासह काही कटलरी माल जाळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाशिकच्या धुमाळ पॉईंट येथील कपड्याच्या दुकानाला आग
नाशिक : शहरातील मेनरोड परिसरात धुमाळ पॉइंट येथील कपड्याच्या दुकानाला सकाळी साडअकरा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बॉम्बच्या मदतीने आग अतिक्यात आणली असून पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
या आगीमुळे कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानातील कपड्यासह काही कटलरी माल जाळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेल्या या परिसरात लॉकडन असल्याने अग्निशमन सलाचे जवान वेळेत बांबसह पोहचू शकले त्यामुळे आगीने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.