नाशिकच्या कॉलेजरोडवर आगडोंब; पाच दुकाने बेचिराख, कोणतीही जीवितहानी नाही
By अझहर शेख | Updated: December 11, 2025 00:14 IST2025-12-11T00:11:42+5:302025-12-11T00:14:32+5:30
शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले.

नाशिकच्या कॉलेजरोडवर आगडोंब; पाच दुकाने बेचिराख, कोणतीही जीवितहानी नाही
नाशिक : कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या छोटू वडापावच्या दुकानात बुधवारी (दि. १०) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका झाला क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. आगीच्या ज्वाला इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने चार ते पाच दुकानांना हानी पोहचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले.
कॉलेज रोडवरील हरी निवास हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यात असलेल्या छोटू वडापाव दुकानामध्ये जोराचा आवाज होऊन आगीच्या ज्वाला भडकल्या. यावेळी या दुकानासह त्याच्या शेजारी असलेली पाचही दुकाने बंद होती. पावणे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. अवघ्या काही मिनिटात आगीने रौद्ररूप धारण केले आणि या चारीपाची दुकानांना वेडा दिला मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तीन दुकाने पूर्णत बेचिराख झाली आहे. घटनेची माहीती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातून पहिला बंब वेगाने घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाला. त्यापाठोपाठ दुसरा मेगाबाउजर बंबासह जवानांची वाढीव कुमक दाखल झाली. त्यानंतर सातपूर उप केंद्राचा मेगा बाऊजर बंबासह जवान दाखल झाले. तीन बंबाच्या सह्याने आग वीस मिनिटांत पूर्णपणे विझविण्यास जवानांना यश आले.
या दुर्घटनेत छोटू वडापाव, कॅफे एक्सप्रेस, कॅम्पस चॉईस,अकबर सोडा ही एका रांगेत असलेली दुकाने जळाली.पहिल्या मजल्यावर हेअर ट्रान्सप्लांटव ट्रीटमेंटचे क्लीनिकसुद्धा जळाले. गंगापूर पोलिसांनीही घटनास्थळी दहावीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले कुलकर्णी चौकाकडून येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्याचे काम सुरू होते आगीचे नेमके कारण समोर आले नसले तरी शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे याबाबत अधिक तपास पोलिसांकडून केला जातो.