शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

बाणगावी गॅरेजला आग; सात दुचाकी भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 22:43 IST

नांदगाव : तालुक्यातील बाणगाव येथे दुचाकी वाहने दुरुस्त करण्याच्या वर्कशॉपमध्ये आग लागून दुरुस्तीसाठी आलेल्या सात दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. स्थनिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

ठळक मुद्देसात लाखांचे नुकसान : संसारोपयोगी साहित्यही खाक

नांदगाव : तालुक्यातील बाणगाव येथे दुचाकी वाहने दुरुस्त करण्याच्या वर्कशॉपमध्ये आग लागून दुरुस्तीसाठी आलेल्या सात दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. स्थनिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.बाणगाव बुद्रूक येथे नांदगाव-येवला रोडलगत पत्र्याच्या गाळ्यात बाबासाहेब गायकवाड यांचे दुचाकी रिपेअरिंगचे दुकान असून सायंकाळी ५ वाजता दुचाकीचे साहित्य घेण्यासाठी ते नांदगावला गेले असता रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास सरपंच संगीता बागुल यांना त्यांच्या दुकानातून धूर निघत आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी परिसरातील नागरिकांना मोबाईलवर संपर्क करून मदतीसाठी बोलावून घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी असलेल्या ७ दुचाकी व स्पेअरपार्ट तसेच या गाळ्याशेजारच्या लगतच्या गाळ्यातील संसारोपयोगी साहित्य जळून अंदाजे ७ लाखांचे नुकसान झाले.ग्रामसेवक युवराज निकम, सरपंच संगीता बागुल, उपसरपंच नारायण कवडे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम कवडे, रवींद्र कवडे, सोमनाथ भामरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. आग कशी लागली याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. माणिकपुंज येथील आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातील होतकरू युवक बाबासाहेब गायकवाड यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नुकताच दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला होता.फोटो - १६बाणगाव फायर 

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा