मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:06 AM2019-07-24T01:06:14+5:302019-07-24T01:07:09+5:30

अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Finishing the tunnel in the Catapada project | मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण

मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण

Next

दिंडोरी : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्याच्या बारा वळण योजना व मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांच्यासह तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, तत्कालीन आमदार उत्तम भालेराव, दिलीप बनकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. काम बंद पडल्यावर ते पुन्हा सुरू व्हावे यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला
होता.
अनेक वर्षे काम रखडलेल्या मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर बोगद्यातून पाणी पश्चिमेकडून वळून ते पूर्वेला वळले असून, ते पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोगद्यातून प्रथमच पाणी वाहिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मांजरपाडा प्रकल्पाला भेट दिली. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात येऊ लागल्याने पूर्व भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, राजेंद्र उफाडे, नीलेश गटकळ, पंढरीनाथ ढोकरे, अमोल गणोरे, भाऊसाहेब गणोरे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, डॉ. अनिल सातपुते, डॉ. विजय गटकळ आदी उपस्थित होते.
मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात येत पाणी गोदावरी खोºयात येऊ लागल्याने या प्रकल्पासाठी प्रयत्न करणाºया आमदार नरहरी झिरवाळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जोरदार पावसाची प्रतीक्षा
मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे व नुकत्याच झालेल्या पावसामुळे बोगद्यातून काहीसे पाणी प्रवाहित झाले मात्र अद्याप या भागात जोरदार पाऊस न झाल्याने पाणी जास्त वाहिलेले नाही मात्र या भागात जोरदार पाऊस होताच सदर बोगद्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू होणार आहे.
च्या परिसरात जांभूळचे प्रसिद्ध झाड होते; मात्र प्रकल्प सुरू होताच ते पाडावे लागले. या प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार झिरवाळ यांनी जांभळाचे झाड लावून या परिसरात पुन्हा औषधी झाडे लावत वनराई फुलविण्याचा मनोदय व्यक्त केला.

Web Title: Finishing the tunnel in the Catapada project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.