शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

...अखेरती चा बार्डर ओलांडण्याचा मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:30 PM

नाशिक : तीन वर्षांपुर्वी बांग्लादेशातून भारताची ह्यबॉर्डरह्ण मैत्रिणीसोबत ओलांडली अन‌् थेट मायानगरी मुंबई गाठली. मैत्रिणीने घात करत ह्यतीह्णचा तीन लाखांत देहविक्रयचा काळ्या बाजारात मुंबईत सौदा केला. एका पुरुषाने ह्यतीह्णला नाशकात पोहचविले आणि शहर पोलिसांनी पिडित बांग्लादेशी तरुणीला सिडकोतील एका घरातून ताब्यात घेत सुटका केली.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालय : देहविक्रयच्या दरीत ढकललेल्या पिडित तरुणीला न्याय

नाशिक : तीन वर्षांपुर्वी बांग्लादेशातून भारताची ह्यबॉर्डरह्ण मैत्रिणीसोबत ओलांडली अन‌् थेट मायानगरी मुंबई गाठली. मैत्रिणीने घात करत ह्यतीह्णचा तीन लाखांत देहविक्रयचा काळ्या बाजारात मुंबईत सौदा केला. एका पुरुषाने ह्यतीह्णला नाशकात पोहचविले आणि शहर पोलिसांनी पिडित बांग्लादेशी तरुणीला सिडकोतील एका घरातून ताब्यात घेत सुटका केली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडधिकारी बी.के.गावंडे यांच्या न्यायालयाने अंतीम सुनावणीत न्यायायलयीन कामकाज संपेपर्यंतची शिक्षा व दोनशे रुपयांचा दंड ठोठावत पिडित तरुणीला मायदेशी पाठविण्याचे आदेश गुरुवारी (दि.३१) दिले.नोकरीच्या शोधात असताना बांग्लादेशातील बोरिशाल जिल्ह्यात राहणाऱ्या मैत्रीणीने दाखविलेल्या मुंबईच्या ब्युटी पार्लरमधील नोकरीच्या आमीषाला बळी पडत तीने नदीच्या पात्रातून भारत-बांग्लादेशाची सीमा २०१९साली ओलांडली. रेल्वेतून मुंबईत पोहचल्यानंतर संशयित ह्यसाथीह्णने देहविक्रयच्या दलदलीत आणून हात सोडला अन‌् मैत्रीचा विश्वासघात केला. मुंबईतील देहविक्रयचा काळाबाजार चालविणाऱ्या एका ह्यआंटीह्णने तिच्यामार्फत स्वत:ची चांगली ह्यकमाईह्ण करुन घेतली आणि भारताचे तिच्या नावानेच बनावट आधारकार्डही हातात टेकविले अन म्हणाली, ह्यये तु रहने दे अपने पास, काम आयेगा....ह्ण काही महिने पिडितेने या दलदलीत काढले.एका ग्राहकाने पोहचविले नाशकात एका पुरुषाने तिची मजबुरी हेरली आणि ह्यआंटीह्णच्या हातावर रक्कम देत तासाभरासाठी बाजारातून बाहेर आणले आणि थेट नाशिकला पोहचविले. सिडको भागात एका कुटुंबात ती पंधरा दिवस राहिली. यावेळी अंबड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बांग्लादेशी नागरिक म्हणून पोलिसांनी पिडितेला ताब्यात घेत तिच्याविरुध्द पारपत्र कायदा, परकीय नागरिक कायद्याप्रमाणे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला....म्हणून पिडितेला दंडाची शिक्षाअतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गावंडे यांच्या न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत पिडितेचे वय आणि तिचा झालेला छळ लक्षात घेता न्यायालयाने तिला माणुसकीच्या भावनेतून पारपत्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात दोनशे रुपये दंड व न्यायालयीन कामकाज आटोपेपर्यंतची शिक्षा सुनावली. यावेळी सरकारी वकील ॲड.विद्या देवरे निकम यांनी युक्तीवाद केला. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले तसेच तीन महिन्यांमध्ये न्यायालयाने खटल्याचा निकाल देत पिडितेला दिलासा दिला आणि तिला तीच्या मायदेशी पाठविण्याचे आदेश पोलीस व अन्य सरकारी यंत्रणेला दिले.पोलिसांचा थेट ह्यकंट्री डायरेक्टरह्णसोबत संपर्कन्यायालयीन आदेशाप्रमाणे पिडित तरुणीच्या पत्त्याची पडताळणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) कमलाकर जाधव यांनी सुरु केली. त्यासाठी पोलिसांनी ह्यकंट्री डायरेक्टर जस्टीस ॲन्ड केअरह्णशी संपर्क साधून पिडित तरुणीच्या पत्त्याबाबत तसेच कुटुंबियाबाबत पडताळणी करण्याची विनंती केली. संबंधितांकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला आणि या अहवालाद्वारे पिडित मुलीच्या आई-वडिलांचे फोटो तिने ओळखले. तिचे वडील मयत झाले असून आई, भाऊ, बहीणींकडे राहणारी पिडित तरुणी बारावी उत्तीर्ण असल्याचेही पुरावे पोलिसांना मिळाले. न्यायालयाच्या आदेशानंतर पिडित तरुणीला ह्यवात्सल्यह्ण महिला सुधारगृहालयात वर्षभराकरिता ३१जुलैपासून दाखल करण्यात आले होते....म्हणुन ह्यबीएसएफह्णचा नकारन्यायालयाचा प्रत्यार्पणाचा आदेश झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे जाधव यांनी तपास सुरु करत पत्रव्यवहार करुन सीमा सुरक्षा दलाशी (बीएसएफ) संपर्क साधला. यावेळी त्यांच्या मुख्यालयाने तीच्याविरुध्द गुन्हा दाखल असल्याने तीला सीमेपार पाठविता येणार नाही, अशी शंका उपस्थित केली. त्यामुळे या गुन्ह्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले गेले आणि न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी या खटल्यात महत्वाचे दाखल दिले. तसेच तपासी अधिकारी कमलाकर जाधव यांनी यासाठी परिस्थितीजन्य सबळ पुरावे न्यायालयापुढे सादर केले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी