मासिक पाळी प्रकरण: अखेर विद्यार्थीनीने शाळेत केलं वृक्षारोपण; अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 19:05 IST2022-07-27T19:02:54+5:302022-07-27T19:05:02+5:30

मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावत युतीवर हा अन्याय केल्याचे समोर आले होते.

Finally, the student planted a tree in the school; An appeal not to believe in superstitions | मासिक पाळी प्रकरण: अखेर विद्यार्थीनीने शाळेत केलं वृक्षारोपण; अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

मासिक पाळी प्रकरण: अखेर विद्यार्थीनीने शाळेत केलं वृक्षारोपण; अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

नाशिक- नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही, अशा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. 

मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावत युतीवर हा अन्याय केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विद्यार्थिनीने थेट नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे दार ठोठावले. अप्पर आयुक्तांना सदर प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर हा सगळा प्रकार माध्यमांनी उजेडात आणला.

सदर प्रकरणानंतर आज आदिवासी विकास विभागाने थेट शाळा गाठत या शाळेच्या आवारात सदर विद्यार्थिनीकडून वृक्षारोपण केले आहे. मासिक पाळी किंवा तत्सम अंधश्रद्धांना बळी पडणार नाही आणि इतर माझ्या मैत्रिणी व विरोध करणाऱ्यांना यापुढे अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थिनीने दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी एका विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे तिला वृक्षारोपण करण्यापासून शिक्षकांनी रोखलं. "या घटनेला दोन-तीन आठवडे झाले असून आम्ही शाळेत गेलो होतो, त्यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी आम्ही मुली झाडे लावायला गेलो. उपस्थित शिक्षक म्हणाले की मागील वर्षी लावलेली झाडे जळून गेली आहेत. तुम्ही झाडे लावू नका. मासिक पाळी आलेल्यांनी झाड लावलं की ते जळतं अशा आशयाचं उत्तर शिक्षकांनी दिलं", असं तक्रारदार युवतीनं सांगितलं होतं.

Web Title: Finally, the student planted a tree in the school; An appeal not to believe in superstitions