अखेर काँग्रेस आमदार खोसकर ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:55 AM2019-11-09T01:55:08+5:302019-11-09T01:55:35+5:30

राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रुपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेत आलेले नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळनंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपूरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.

Finally Congress MLA Khoskar 'not rechable' | अखेर काँग्रेस आमदार खोसकर ‘नॉट रिचेबल’

अखेर काँग्रेस आमदार खोसकर ‘नॉट रिचेबल’

Next

नाशिक : राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रुपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेत आलेले नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळनंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपूरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू असून, त्यात शिवसेनेला मात देण्यासाठी कॉँग्रेस व अन्य पक्षांच्या आमदारांना फोडून सत्तास्थापनेचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. याच प्रयत्नात इगतपुरीतून कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्याा नवनिर्वाचित हिरामण खोसकर यांनाही आॅफर देण्यात आल्याचे बोलले गेले. गुरुवारी (दि.७) त्यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता प्रारंभी असे काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रात्रीत पुन्हा काय झाले हे स्पष्ट झाले नसले तरी खोसकर यांनी मात्र मध्यस्थांमार्फत आपल्याशी संपर्क साधून मुंबईला भेटीस बोलविल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
यानंतर शुक्रवारी (दि. ८) सकाळपासून खोसकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असून, त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र
खोसकर हे जयपूरला गेल्याचे सांगितले.
आमदारांना धाकदपटशा किंवा आमिष दाखवून फोडले जाण्याची भीती लक्षात घेता कॉँग्रेसतर्फे सर्व आमदारांना जयपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याच अंतर्गत खोसकर हेदेखील नाशिकमधून मुंबईला रवाना झाले असून, तेथून जयपूरला जाणार असल्याचे समजते.
‘गद्दारी अशक्यच’
जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले खोसकर ऐनवेळी तिकिटासाठी राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहेत. कॉँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या निर्मला गावित यांचा त्यांनी पराभव केला. आपण कॉँग्रेसशीच एकनिष्ठ असून, पक्ष बदलण्याचा किंवा गद्दारी करण्याचा किंचितही विचार करू शकत नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Web Title: Finally Congress MLA Khoskar 'not rechable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.