Final schedule for the Class X, XII Exam has been announced | दहावी, बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर सोमवार (दि. १८) 
पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असून, एकाचवेळी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा होणार आहे.


या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना ँ३३स्र://६६६.ेंँंँ२२ूुङ्मं१.िेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे स्वतंत्रपणे नियोजन करण्यात येणार असून, संबंधित वेळापत्रक परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. दरम्यान, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह अनेक खासगी क्लासेसचालकांनी दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनास सुरुवात केली असून, पालक व शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागण्याचा सल्ला दिला जात आहे.
ताण कमी करण्यासाठी
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे व्यवस्थित नियोजन करणे सोपे जावे आणि त्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी मंडळातर्फे परीक्षेच्या चार महिन्यांपूर्वीच अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर
१५ दिवसांत प्राप्त सूचनांचा विचार करून मंडळाने सोमवारी (दि.१८) परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले असून, छापील स्वरूपातील अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात येणार आहे.

Web Title:  Final schedule for the Class X, XII Exam has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.