ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच रूपाली पिंपळे, उपसरपंच अनिल शिरसाठ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीने मासिक सभेत ग्रामपंचायत कार्यालयात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात वीज भरणा केंद्र, रेशन कार्ड संबंधित कामे, सर्व प्रकारचे शासकीय अनुदान अर्ज, ऑनलाइन पीकविमा भरणे, बँकेतून पैसे काढणे किवा टाकणे, पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करणे, पॅनकार्ड काढणे, मोबाइल रिचार्ज व डिश टीव्ही रिचार्ज, रेल्वे तिकीट व विमान तिकीट, शेतीसंबंधित सर्व ऑनलाइन अर्ज भरणे, शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे सर्व प्रकारचे दाखले काढून देणे, शालेय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरणे आदी कामे केली जाणार आहेत. सदर योजनेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. बैठकीस माजी उपसरपंच रवींद्र शिंदे, सदस्य सचिन सिरसाट, दत्तू ठोक, एकनाथ सिरसाट, मीरा काकड, योगीता सिरसाट, सुनीता मोरे, संध्या राजगुरू, शुभम माळी, शुभांगी घोलप, चंचल सांगळे, राजू जाधव, माया जाधव, हिराबाई माळी, सुवर्णा सिरसाट, ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर आदी उपस्थित होते.
थकबाकी भरा, वर्षभर मोफत शुद्ध पाणी प्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST