विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:10 IST2019-03-19T23:20:02+5:302019-03-20T01:10:13+5:30
विहितगाव वालदेवी वीटभट्टीरोड येथे घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध विनयभंग तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिकरोड : विहितगाव वालदेवी वीटभट्टीरोड येथे घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध विनयभंग तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विहितगाव वीटभट्टीरोड वालदेवीनगर येथे राहणाऱ्या पीडित मुलीचे वडील शनिवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. आई नातेवाइकाच्या साखरपुड्यानिमित्त विहितगाव येथे गेलेली असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास वालदेव वालदेवीनगर येथे पाहुणा आलेला संशयित बुडान हसन पठाण (४०) याने घरात घुसून मुलीचा विनयभंग केला. सदर प्रकार पीडित
मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर याप्रकरणी संशयित पठाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.