घारपुरे घाट येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:10+5:302021-09-25T04:14:10+5:30

सचिन चव्हाण (२१), आकाश उर्फ शुभम घनवटे (१९), बबन धनवटे (४८) चैतन्य कासव (१९) व मक्या उर्फ मकरंद देशमुख ...

Fighting between two groups at Gharpure Ghat | घारपुरे घाट येथे दोन गटांत हाणामारी

घारपुरे घाट येथे दोन गटांत हाणामारी

सचिन चव्हाण (२१), आकाश उर्फ शुभम घनवटे (१९), बबन धनवटे (४८) चैतन्य कासव (१९) व मक्या उर्फ मकरंद देशमुख अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे, तर गोदावरी घाट परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अथर्व अजय दाते (१७ रा.अशोक स्तंभ) या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, दाते व प्रतीक भालेराव यास सोबत घेऊन बुधवारी (दि.२२) सायंकाळी घारपुरे घाट येथील मकवाना चाळ येथे घरासमोर सचिन चव्हाण यास पतंग उडविण्याच्या जुन्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेलो असता चव्हाणसह आकाश धनवटे, बबन धनवटे आणि अल्पवयीन मुलाने दोघांना शिवीगाळ करीत झटापट केली. यावेळी संशयित त्रिकुटाने पकडून ठेवले असता अल्पवयीन मुलाने जिवे मारण्याच्या हेतूने दाते याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत दाते गंभीर जखमी असून, पोलिसांनी सचिन चव्हाण, आकाश धनवटे आणि बबन धनवटे यांना अटक केली आहे, तर सचिन चव्हाण याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी चैतन्य कासव (१९), मक्या उर्फ मकरंद देशमुख, अथर्व दाते, प्रतीक भालेराव आणि आकाश नामक युवकाशी वाद झाला होता. सायंकाळच्या सुमारास संशयितांनी मकवाना चाळ येथे येऊन चव्हाण व शेजारी बबन व आकाश धनवटे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी मक्याने कमरेला लावलेला पिस्तूल दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. याघटनेत चैतन्य कासव आणि मकरंद देशमुख या दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक विष्णू भोये आणि उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.

Web Title: Fighting between two groups at Gharpure Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.