शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

दातीरांचा लढा, सेनेचे बळ अन् भाजपा-कॉँग्रेसचा खो‘

By admin | Updated: January 8, 2017 01:32 IST

भंगार’ राजकारण : दीर्घकालीन न्यायालयीन लढ्यानंतर बाजार हटला; मनपा निवडणुकीत ठरणार प्रचाराचा मुद्दा

नाशिक : अंबड-लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढाई लढली आणि शनिवारी दातीर यांच्या लढ्याला प्रत्यक्ष यश आले. दातीर यांना शिवसेनेचेही मनोबल लाभले. मात्र, सदर भंगार बाजार वाचविण्यासाठी भाजपा व कॉँग्रेसच्या नेत्यांनी शेवटपर्यंत ‘खो’ घालण्याचे प्रकार उघड झाल्याने त्याचा परिणाम दोन्ही पक्षांवर आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंबड-लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजाराने शहरातील कायदा व सुव्यवस्थेला नेहमीच आव्हान दिले. भंगार बाजार परिसरात गुन्हेगारांना आश्रय दिला जात असल्याचेही पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयिताच्या अटकेने समोर आले. याशिवाय, चोरीचा मालही या भागातून अनेकदा हस्तगत करण्यात आला. दिवसाढवळ्या या भागातून महिलांना एकटे जाणे धोकेदायक मानले जात होते. त्यामुळे भंगार बाजारविरुद्ध नाशिककरांमध्ये कमालीचा रोष होता. त्यामुळेच सदर भंगार बाजार हटविण्यासाठी १९९५ च्या सुमारास भंगार बाजार विरोधी कृती समितीची स्थापना झाली. मात्र, या भंगार बाजार हटविण्याच्या कृतीला जुलै २००७ पासून खऱ्या अर्थाने वेग घेतला. सन २००७ च्या निवडणुकीत सेनेचे दिलीप दातीर महापालिकेत निवडून गेले आणि त्यांनी पहिल्यांदा भंगार बाजारविरोधी उघडपणे भूमिका घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल मनपाच्या बाजूने लागूनही प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याने शिवसेनेने तत्कालीन आयुक्त विलास ठाकूर यांच्या निवासस्थानासमोर रास्ता रोकोही केला होता. मध्येच सन २०१० मध्ये राज्य शासनाकडूनही स्थगितीचे आदेश आले. त्यामुळे दातीर यांनी जानेवारी २०११ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दातीर यांनी तब्बल दहा वर्षे न्यायालयीन लढाई लढली आणि अखेर न्यायालयाने दातीर यांच्या बाजूने निकाल देत भंगार बाजार हटविण्याला हिरवा कंदील दाखविला. दातीर यांच्या या लढ्याला शिवसेनेचेही बळ लाभले.
मात्र, गेल्या काही दिवसांत भंगार बाजार हटविण्याची कारवाई निश्चित होताच भाजपा आमदारांकडून दबावाचे राजकारण सुरू झाल्याची तक्रार दिलीप दातीर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली, तर साक्रीच्या कॉँग्रेस आमदाराचे बनावट पत्राचा घोळ समोर आल्याने कॉँग्रेसचाही सहभाग उघड झाला. बहुचर्चित भंगार बाजार हटविण्याचे श्रेय सेनेकडे जात असल्याने येत्या महापालिका निवडणुकीत सेनेकडून या प्रकरणाचा लाभ उठविला जाईल तर भाजपा व कॉँग्रेसला मतदारांना उत्तर देताना दमछाक होणार आहे.