कारवाई टाळण्यासाठी पन्नास हजार लाचेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 12:32 AM2021-05-21T00:32:14+5:302021-05-21T00:32:54+5:30

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथे वन खात्याच्या जमिनीवर पाईपलाईनसाठी खोदलेल्या चारीबाबत कारवाई करू नये यासाठी वनविभागाचे परिमंडळ अधिकारी व दोन वनरक्षक यांनी एक लाखाची लाच मागितली होती तडजोडीनंतर ५० हजारांची लाच मागणीप्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fifty thousand to avoid action | कारवाई टाळण्यासाठी पन्नास हजार लाचेची मागणी

कारवाई टाळण्यासाठी पन्नास हजार लाचेची मागणी

Next
ठळक मुद्देपुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे.

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथे वन खात्याच्या जमिनीवर पाईपलाईनसाठी खोदलेल्या चारीबाबत कारवाई करू नये यासाठी वनविभागाचे परिमंडळ अधिकारी व दोन वनरक्षक यांनी एक लाखाची लाच मागितली होती तडजोडीनंतर ५० हजारांची लाच मागणीप्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचखेड येथील फिर्यादी यांचे शेत बहादूर शिवार येथे असून शेतीकरिता पाणी आणण्यासाठी शेतीलगत असलेल्या वनविभागाच्या जागेतून पाईपलाईनसाठी मजुरांमार्फत खोदकाम केले होते. सदर काम विनापरवानगी केले असल्याने कायदेशीर कारवाई करू नये यासाठी वन परिमंडळ अधिकारी अनिल चंद्रभान दळवी, वनरक्षक उस्मानगनी गनीमलंग सय्यद व सुरेखा अश्रूबा खजे यांनी एक लाखांची लाच मागितली होती.

याबाबत तक्रारदार शेतकऱ्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने त्याची पडताळणी करत सदर तिघांनी तडजोडी अंती पंचासमक्ष ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निदर्शनास आले लाचलुचपत विभागाने तिघांनाही रंगेहाथ पकडत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे.

Web Title: Fifty thousand to avoid action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.