सटाण्यात कचº्यापासून खत निर्मिती सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:33 IST2020-03-04T15:32:44+5:302020-03-04T15:33:07+5:30
. सटाणा: येथील डेपोवरील कचº्यापासून प्रत्यक्ष खत निर्मितीस सुरु वात झाली असून येत्या सहा महिन्यात संपूर्ण कचरयाची विल्हेवाट लागून ५ एकर जागा मोकळी होईल अशीमाहितीनगराध्यक्ष मोरे यांनी दिली.. पालिकेच्या कचरा डेपोवरील बायोगॅस प्रकल्पावर कार्यान्वित झालेल्या मलिनस्सारण केंद्रास मंगळवारीनगराध्यक्ष सुनील मोरे यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केलीयाठिकाणी प्रस्तावित कामांच्या जागेची पाहणी करून बांधकामाबाबत नगराध्यक्षांनी माहिती जाणून घेतली.

सटाणा येथील पालिकेच्या कचरा डेपोवरील मलिनस्सारण केंद्राच्या कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष सुनील मोरे व पदाधिकारी,अधिकारी.
शहरातील नागरी वसाहती वाढतानाच विविध प्रकारचे उद्योग,व्यवसायही भरभराटीस आले आहेत.यामुळे शहरातून दररोज संकलित होणाº्या शेकडो क्विंटल कचº्याची विल्हेवाट लावणे गरजेचे बनले आहे.याच ठिकाणी मलिनस्सारण केंद्र उभारण्यात आले आहे.या केंद्रात जमा होणाº्या मैल्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रि या करून खत निर्मिती करण्यात येत आहे.याठिकाणी दररोज संकलित होणाº्या कचर्यातील प्लास्टिक,काचा व अन्य वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी शेड उभारणी करण्यात येत आहे.दररोज संकलित होणार्या कचº्याची त्याचदिवशी विल्हेवाट लागून त्यातून खतनिर्मिती होणार आहे. शहरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांसह चौगाव बर्डी येथील पुनद पाणी पुरवठा योजनेचा नवीन जलकुंभ,जंगम व बोहरी समाज दफनभूमी कंपाऊंड,रिंग रोड, अभ्यासिका,नानी पार्क,फुट ओव्हर ब्रिज या कामांच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली.सद्यस्थितीत सुरू असलेली सर्व विकासकामे मुदतीत पूर्ण करण्याची सूचनाही यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी संबंधितांना दिली. शहरात सुरू असलेल्या सर्वच विकासकामांवर बारकाईने लक्ष पुरवून अधिकाधिक दर्जेदार व लोकोपयोगी होण्यासाठी वारंवार देण्यात येणार्या या भेटीमुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांचेसह आरोग्य सभापती दीपक पाकळे, गटनेता दिनकर सोनवणे,आरोग्य निरीक्षक माणकि वानखेडे,बांधकाम अभियंता चेतन विसपुते,मुकादम किशोर सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर,हेमंत भदाणे आदींउपस्थित होते.