संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ६३ लोकांविरुध्द गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:35 PM2020-03-23T18:35:32+5:302020-03-23T18:38:53+5:30

शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे.

Felony charges against 3 persons for violation of communication | संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ६३ लोकांविरुध्द गुन्हे दाखल

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ६३ लोकांविरुध्द गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देसुमारे ९४३ आस्थापनांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई रविवारी रात्रीची संचारबंदी मोडणा-या ६३ लोकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे

नाशिक : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यांतर्गत ज्या व्यावसायिकांकडे गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा लोकांना पोलिसांकडून सातत्याने नोटिसांद्वारे गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मागील तीन दिवसांत आयुक्तालय हद्दीत ९४३ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच साथरोग प्रतिबंधक व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणा-या एकूण २२६ लोकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. यामध्ये रविवारी रात्रीची संचारबंदी मोडणा-या एकूण ६३ लोकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद अशा सर्वच शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर राबत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडूनसुद्धा अधिक खबरदारी घेतली जात आहे. राज्यात रविवारी (दि.२२) मध्यरात्री कलम १४४ नुसार जमावबंदी आदेशदेखील लागू केला गेला आहे. गर्दीला कारणीभूत ठरणा-या व्यावसायिकांवर (जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता) गुन्हे दाखल केले जात आहेत. शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन करणा-या अशा सुमारे ९४३ आस्थापनांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइन शॉप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे.

Web Title: Felony charges against 3 persons for violation of communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.