आंबेगावी सैन्य दलातील जवानांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 17:46 IST2018-09-16T17:45:54+5:302018-09-16T17:46:47+5:30

जळगाव नेऊर  परिसरातील आंबेगाव येथे सैन्य दलातील जवानांचा सत्कार करण्यात आला.

Felicitates the soldiers of the Ambegaony army | आंबेगावी सैन्य दलातील जवानांचा सत्कार

आंबेगावी सैन्य दलातील जवानांचा सत्कार

मनोज गीते मित्रमंडळातर्फे आंबेगाव येथील भूमिपुत्र ऋषिकेश आव्हाड व मयूर आवटे यांची भारतीय सैन्य दलात निवड तर सचिन आव्हाड याची राखीव पोलीस दलात भरती झाली. या भूमिपुत्रांबरोबरच वाकी येथील रहिवासी सुहास कोकणे याची सैन्यदलात तर पाचोरा येथील वाल्मीक आव्हाड यांची वनरक्षक म्हणून निवड झाल्याने या सर्वांचा सत्कार आंबेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जवानांच्या आई-वडिलांचेही कौतुक करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब लोखंडे, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, डी. के.जगताप, येवला पंचायत समितीचे माजी सभापती कोंडाजी कदम, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, तुकाराम गांगुर्डे, बाबुराव पालवे, तानाजी जाधव, येवल्याचे नगराध्यक्ष बंडू शिरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर ,मनोज गिते, मल्हारी दराडे आदी उपस्थित होते. युवकांनी शिक्षणानंतर देशसेवेचा पर्याय निवडत सैन्य दलात सामील होत देशाची सुरक्षा उचलण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या हातून देशाची सेवा होऊन महाराष्ट्राबरोबरच आंबेगावचेही नाव उज्वल होवो अशा शुभेच्छा दिघोळे यांनी दिल्या. यावेळी थोरे यांनी जवानांना प्रेरणा दिल्याबद्दल मातापित्यांचेही कौतुक केले. याप्रसंगी बनकर व होळकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जवानांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नंदू औटे यांनी केले.

 

 

 

Web Title: Felicitates the soldiers of the Ambegaony army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.