पंचवटी वाचनालयाच्या वतीने सत्कार

By Admin | Updated: March 29, 2017 00:31 IST2017-03-29T00:31:43+5:302017-03-29T00:31:57+5:30

पंचवटी : ग्रंथालयामुळे यश मिळते, वाचनाने ज्ञान प्राप्त होते म्हणून नियमित वाचन करावे. वाचनालय हे संस्काराचे उत्तम साधन आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी केले.

Felicitated on behalf of Panchavati Library | पंचवटी वाचनालयाच्या वतीने सत्कार

पंचवटी वाचनालयाच्या वतीने सत्कार

पंचवटी : ग्रंथालयामुळे यश मिळते, वाचनाने ज्ञान प्राप्त होते म्हणून नियमित वाचन करावे. वाचनालय हे संस्काराचे उत्तम साधन आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी केले.  इंद्रकुंड येथील पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या ४३व्या वर्धापनदिननिमित्त ग्रंथपाल, वाचक व विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी बर्डेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी के. के. मुखेडकर होते.  व्यासपीठावर मविप्र संचालक डॉ. सुनील ढिकले, माधव भणगे, बाबूराव मखेडकर, प्रकाश वैद्य आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बर्डेकर यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञान चांगले आहे, मात्र युवापिढीकडून त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विधीसंघर्षित बालकांची समस्या मोठी आहे. विधीसंघर्षित बालकांना सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे ते शेवटी म्हणाले.  यावेळी आदर्श ग्रंथपाल म्हणून अनिल कोठावदे, यांना ल. स. वैद्य पुरस्काराने गौरविण्यात आले, तर आदर्श वाचक म्हणून चंद्रशेखर देशपांडे, पायल पंचाक्षरी यांना तर निबंध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या हर्षल कोठावदे, राहुल लहामगे, विशाल शेवाळे, सुनीता पाटील, सुनंदा परांजपे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्र मास सुभाष पाटील, रामनाथ खुळे, धनंजय धनवटे, आदिंसह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक नथू देवरे यांनी, तर सूत्रसंचालन हिरालाल परदेशी यांनी केले. (वार्ताहर)


 

Web Title: Felicitated on behalf of Panchavati Library