वशीकरण करणाऱ्या बाबाचा ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:59 IST2019-08-31T00:58:53+5:302019-08-31T00:59:14+5:30
वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून पाच महिलांसह देश-विदेशांतील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे.

वशीकरण करणाऱ्या बाबाचा ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा
नाशिक : वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून पाच महिलांसह देश-विदेशांतील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे.
वशीकरणाच्या माध्यमातून भोंदूगिरी करणाºया संशयिताने वेबसाइट आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विविध समस्यांनी पीडित महिलांशी संवाद साधत त्यांना जाळ्यात ओढले व त्यांच्याकडून विविध आघोरी पूजांचे प्रकार सांगून अर्धनग्न अवस्थेतील फोटो व रक्कम आॅनलाइन मागवून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली. वशीकरणाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणारा संशयित दिल्लीतील नीरज अशोककुमार भार्गव (२३) असून, त्याने वेगवेगळे नंबर आणि व्हाइस चेंजर अॅपच्या माध्यमातून पंडित रुधर शर्मा, खान बाबा अजमेर आणि राधे मॉँ यांच्या आवाजात महिलांशी संवाद साधत नाशिकसह दिल्ली, न्यूझीलंड, कॅनडा, येथून उच्च शिक्षित महिलांना जाळ्यात ओढले. वेगवेगळ्या फोननंबरवरून वेगवेगळ्या नावाने महिलांशी संपर्क साधत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्योग चालविला होता.