कोळमखुर्द येथे पोलीसपाटलाचा पित्याकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:38 IST2021-04-24T01:37:00+5:302021-04-24T01:38:12+5:30

येवला तालुक्यातील कोळम खुर्द येथील युवा पोलीस पाटील गणेश विलास भांडे (३७) यांचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून जन्मदात्या पित्यानेच जमिनीच्या वादातून  खून केला  आहे.

Father murdered by police at Kolamkhurd | कोळमखुर्द येथे पोलीसपाटलाचा पित्याकडून खून

कोळमखुर्द येथे पोलीसपाटलाचा पित्याकडून खून

येवला : तालुक्यातील कोळम खुर्द येथील युवा पोलीस पाटील गणेश विलास भांडे (३७) यांचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून जन्मदात्या पित्यानेच जमिनीच्या वादातून  खून केला  आहे. या प्रकारणी पित्यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, आईच्या व मुलाच्या नावावर असलेली जमीन स्वत:च्या नावावर करण्यासाठी पिता-पुत्रात कौटुंबिक कलह सुरू होता.  
याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भावरी, साहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस शिपाई आबा पिसाळ, राजू चव्हाण आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खून करणाऱ्या विलास भांडेला अटक केली. 

Web Title: Father murdered by police at Kolamkhurd