‘नंदिनी’ प्रदूषणमुक्ततेसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:22 IST2018-12-16T22:33:22+5:302018-12-17T00:22:55+5:30

एमआयडीसीचे रसायनयुक्त व नागरिकांचे सांडपाणी कचरा यामुळे गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेल्या नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाशी सामना करावा लागत आहे. या प्रदूषणामुळेच नदीला नासर्डी नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाल्याने नंदिनी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी तरुणाई नदीत उतरून साखळी मोहीम राबवित आहे.

Fasting for 'Nandini' pollution free | ‘नंदिनी’ प्रदूषणमुक्ततेसाठी उपोषण

‘नंदिनी’ प्रदूषणमुक्ततेसाठी उपोषण

ठळक मुद्देतरुणांचा उपक्रम : नदीत उतरून राबविली साखळी मोहीम

नंदिनी नदीच्याप्रदूषण मुक्ततेसाठी साखळी मोहिमेत तरुणाईने नदीत उतरून सुरू केलेले प्रयत्न.
सिडको : एमआयडीसीचे रसायनयुक्त व नागरिकांचे सांडपाणी कचरा यामुळे गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेल्या नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाशी सामना करावा लागत आहे. या प्रदूषणामुळेच नदीला नासर्डी नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाल्याने नंदिनी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी तरुणाई नदीत उतरून साखळी मोहीम राबवित आहे.
नाशिकची आई, गोदामाई..’, नमामि गोदा संस्थेच्या उपक्रमाला साई व साईकृष्णा कोचिंग क्लासेस यांची साथ लाभली. शनिवारी शेकडो विद्यार्थी व युवकांनी नंदिनी नदीच्या प्रदूषण मुक्ततेची शपथ घेत नदीत उतरून साखळी मोहीम राबविली. सर्वांनी हातात हात घेऊन नदीच्या प्रदूषण मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू केले. नंदिनी नदी जोपर्यंत प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत ही साखळी मोहीम वाढवली जाणार आहे. नमामि गोदाचे अध्यक्ष राजेश पंडित, साई क्लासेसचे शिक्षक सागर परेवाल, सुनीता बावने, विजय सोनवणे यांनी विद्यार्थी व गोदासेवक युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी नितीन हिंगमिरे, रोहित गोसावी, अतिष पाटील, मनोज सावंत, कुणाल जाधव, स्वप्नील जाधव, उदय मुळे, रोहित कुलकर्णी, रोहन कातकाडे, सचिन महाजन, मयूर लवटे, पंकज महाजन आदी उपस्थित होते.
सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नंदिनी नदी प्रदूषण मुक्ततेसाठी निवेदन देणार, एमआयडीसीतील केमिकलचे पाणी नदीत सोडण्यापासून रोखण्यात येणार, नागरिकांचे सांडपाणी नदीत सोडण्याचे रोखणार, नंदिनी नदीत कचरा न टाकण्याचे नागरिकांना आवाहन करणार, सर्व नाशिककरांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबविणार.

Web Title: Fasting for 'Nandini' pollution free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.