शेतकाऱ्यांना रब्बी हंगामाच्या भांडवलाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:54 IST2020-09-24T18:53:25+5:302020-09-24T18:54:13+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने बाजरी, मका, कांदा रोपे, कांदा पिकाची दाणादाण झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला मका, सोयाबीन, बाजरीचा घास मुसळधार पावसात वाहून जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकाऱ्यांना रब्बी हंगामाच्या भांडवलाची चिंता
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने बाजरी, मका, कांदा रोपे, कांदा पिकाची दाणादाण झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला मका, सोयाबीन, बाजरीचा घास मुसळधार पावसात वाहून जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पाऊसही मोठा लपंडाव खेळत असून, एका गावावर पाऊस, दुसºया गावावर वादळ यामुळे काही गावातील मका उद्ध्वस्त झाला तर काही गावातील मका उभा आहे. चार चार वेळा कांदा बियाणे टाकूनही जमिनीवर येण्याच्या अगोदरच मुसळधार पावसाच्या तडाख्याने झोडपल्याने कांदा बियाणे संपुष्टात येऊन हजारो रु पये खर्च वाया गेल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले असून, शेतकºयांना कांदा पिकाला मुकावे लागणार आहे. अगोदरच लावलेला पोळ कांदा नष्ट झालेला असताना कांदा पीक संकटात सापडले आहे तर अनेक शेतकºयांचे मुसळधार पावसाने बाजरीचे पीक पाण्यात असून, एकूणच खरिपातील पिकांची दाणादाण झाल्याने शेतकºयांना मात्र खरिपातील पिके डोळ्यादेखत नष्ट होत चाललेली असताना त्याच खरीप पिकांच्या भरवशावर रब्बी पिके उभी करण्यासाठी भांडवल उभे कसे करावे याची चिंता पडली आहे. गेली दहा-बारा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सोंगणीसाठी आलेले मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग या पिकांना मात्र त्याचा फटका बसत असून, पिके संकटात सापडली आहेत. यावर्षी सोंगणीचे दर वाढले असून, मागील वर्षी मका व सोयाबीन चार हजार रु पये प्रतिएकरप्रमाणे सोंगणी केली जात होती. यावर्षी मात्र मुसळधार पावसाने मजूर कामावर येत नसल्याने सोंगणीचे दर हजार ते पंधराशे रु पयाने वाढले आहेत.
माझा अडीच एकर मका असून, दररोज चालणाºया मुसळधार पावसाने मका भुईसपाट झाला आहे. शासनाने बाजरी, मका, कांदा या नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, जेणेकरून त्यांना रब्बी पिके तरी उभे करता येतील.
- विलास कदम, नेऊरगाव
मका, बाजरी, सोयाबीनचे दर
(प्रतिक्विंटलचे भाव सरासरी)
मका - १२२१
सोयाबीन - ३७५१
बाजरी - ११४८
फोटो : नेऊरगाव येथील विलास कदम यांची भुईसपाट झालेले मका पीक.
(24जळगाव नेऊर1)