शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविणार

By admin | Updated: September 26, 2015 00:06 IST

राजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संकल्प

नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला असून, कर्जबाजारी वाढल्याने शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक येथे रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, निसर्गाचा समतोल ढासळल्याने कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे अतिवृष्टी-गारपिटीसारखे संकट येत आहे. याला समाजातील उच्चभ्रू लोकांचा चंगळवाद जबाबदार असून, बेसुमार जंगलतोड करून सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्त्या करत आहे. त्याला मदत करण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून समाजाचीदेखील आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव तथा आत्महत्त्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी आत्महत्त्या करताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या नावाने अभियान सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू नये यासाठी प्रयत्न करणार असून, संघटनेतर्फे सर्वेक्षणदेखील सुरू आहे, तसेच शेतकऱ्याला खासगी कर्जफेडीसाठी मदत करावी. सरकारने त्यासाठी दहा वर्षांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही शेट्टी यांनी सांगितले.दरम्यान, रामकुंडावर शेट्टी यांनी गोदामातेचे पूजन करून गंगागोदावरी मंदिरात दुष्काळ निवारणार्थ साकडे घातले. (प्रतिनिधी)