शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

कळवणला जिल्हा बॅँकेकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:15 AM

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकी वसुलीसाठी कडक धोरणांचा अवलंब केल्याने थकबाकी वसुली अधिकारी व कर्मचाºयांना यश येत आहे. या मोहिमेंतर्गत कळवण तालुक्यात ६० ट्रॅक्टर जप्त करण्यात येऊन त्यात २९ थकबाकीदारांकडून १ कोटी २० लाख रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली होती. जप्त केलेल्या ३१ पैकी २२ ट्रॅक्टरचा लिलाव करून ८० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली. ६० ट्रॅक्टर जप्तीतून २ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाल्याने तालुक्यातील अन्य थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

कळवण : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकी वसुलीसाठी कडक धोरणांचा अवलंब केल्याने थकबाकी वसुली अधिकारी व कर्मचाºयांना यश येत आहे. या मोहिमेंतर्गत कळवण तालुक्यात ६० ट्रॅक्टर जप्त करण्यात येऊन त्यात २९ थकबाकीदारांकडून १ कोटी २० लाख रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली होती. जप्त केलेल्या ३१ पैकी २२ ट्रॅक्टरचा लिलाव करून ८० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली. ६० ट्रॅक्टर जप्तीतून २ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाल्याने तालुक्यातील अन्य थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी संबंिधतांची ट्रॅक्टरसह वाहने, मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. याविरोधात गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला कुलूप लावण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयत्न केला होता. शेतकºयांचे ट्रॅक्टर लिलाव थांबवून ट्रॅक्टर परत करावे यासह इतर मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्याने कळवण येथे ट्रॅक्टर लिलाव होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र विरोध झुगारून अध्यक्ष केदा अहेर यांनी लिलाव करण्याच्या सूचना केल्याने शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टरचे लिलाव होऊन ८० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली. थकबाकी वसुली करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचाºयांनी कडक पावले उचलावीत, अडचण आल्यास मला फोन करावा व मार्चअखेरीस थकबाकी वसुली करावी अशा सूचना अहेर यांनी दिल्याने गावोगावी जिल्हा बॅँक थकबाकी वसुली पथकांच्या माध्यमातून ६० ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. २९ ट्रॅक्टर थकबाकीदारांनी एक कोटी २० लाख रुपयांची थकबाकी भरल्याने ते ट्रॅक्टर सोडून देण्यात आले. उर्वरित ३१ ट्रॅक्टरपैकी २२ ट्रॅक्टरचा कळवण येथे जाहीर लिलाव करण्यात येऊन त्या लिलावातून ८० लाख रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली, तर उर्वरित ९ ट्रॅक्टरचे फेरलिलाव करण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी जयवंत बोरसे यांनी सांगितले.ट्रॅक्टर लिलाव प्रक्रियेप्रसंगी नाशिक कार्यालयाचे पी. एम. ढगे, के. पी. कदम, कळवणचे विभागीय अधिकारी जे. व्ही. बोरसे, वसुली अधिकारी योगेश मालपुरे, नीलेश पगार, आर. एन. बोरसे, बी. एन. चव्हाण, गोकुळ जगताप, गौरव वाघ, तालुक्यातील शाखा व्यवस्थापक व कर्मचारी आदी उपस्थित होते.... तर थकबाकीदारांवर गुन्हेवसुली मोहीम तीव्र करण्यात येणार असून, कलम १०१ च्या दाखल्यानुसार कर्जाने घेतलेले ट्रॅक्टर जप्त करायला गेल्यास ट्रॅक्टर किंवा अन्य वाहन जागेवर नसल्यास संबंधित थकबाकीदारांवर गुन्हा दाखल करावा. ज्या थकबाकीदार सभासदांवर जप्ती बोजे लागले असतील व ते सभासद कर्ज फेडत नसतील तर निबंधक कार्यालयात प्रकरणे दाखल करावे. निकालानंतर संबंधित थकबाकीदाराच्या सातबारा उताºयावर जिल्हा बॅँकेचे नाव लावावे. वाहन कर्जवसुलीसाठी गेल्यावर वाहन जागेवर न सापडल्यास पंचनामा करून थकबाकीदाराविरु द्ध ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आदी अशा सूचना अध्यक्ष केदा अहेर यांनी वसुली पथकाला केल्या आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी