किसान सन्मान योजनेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:24 IST2019-02-07T18:23:31+5:302019-02-07T18:24:32+5:30
केंद्र सरकारने शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांचे कागदपत्र जमविण्याची जबाबदारी दिलेल्या अधिकाºयांच्या जिवाला घोर लागला आहे. निधीप्राप्तीसाठी कागदपत्र जमा करण्याचे संबंधित अधिकाºयांनी आवाहन केले आहे.

किसान सन्मान योजनेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष
नायगाव : केंद्र सरकारने शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांचे कागदपत्र जमविण्याची जबाबदारी दिलेल्या अधिकाºयांच्या जिवाला घोर लागला आहे. निधीप्राप्तीसाठी कागदपत्र जमा करण्याचे संबंधित अधिकाºयांनी आवाहन केले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रूपयांचे साहाय्य देण्याची योजना तयार केली आहे. या योजनेस पात्र शेतकºयांनी अनुदान लाभासाठी आधार कार्ड, बँक पासबुक तसेच सामायिक खातेदारांनी स्वयंघोषणा पत्र गावातील तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करूनही शेतकरी या अनुदान प्राप्तीसाठी कागदपत्रे देण्यास सहकार्य करत नसल्याने संबंधित तलाठी अधिकारी हैराण झाले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकºयांना राष्ट्रीय कर्जमाफीची घोषणा होणार, अशी आस लावून शेतकरी बसले होते. मात्र प्रत्यक्षात केंद्राने दिवसाला १७ रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला मिळत असलेला मातीमोल भाव व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहे. त्यामुळे दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करूनही ती मिळाली नसल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.