शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाची शेतकऱ्यांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:25 IST

येवला तालुक्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग आलेला असताना थंडीतदेखील चांगली वाढ झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके बहरली होती. मात्र, रविवारी (दि.२) अचानक वातावरण पुन्हा बदलले. सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांनी पिके जाण्याचा धसका घेतला असून, विविध प्रकारच्या औषध फवारणीवर जोर दिला आहे.

ठळक मुद्देचिंता : येवला तालुक्यात हरभरा उत्पादनात घट होण्याची शक्यता

मानोरी : येवला तालुक्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग आलेला असताना थंडीतदेखील चांगली वाढ झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके बहरली होती. मात्र, रविवारी (दि.२) अचानक वातावरण पुन्हा बदलले. सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांनी पिके जाण्याचा धसका घेतला असून, विविध प्रकारच्या औषध फवारणीवर जोर दिला आहे.रविवारी दिवसभर अनेक ठिकाणी शेतकरी उन्हाळ कांदा लागवडीवर, गव्हावर तसेच हरभरा पिकावर औषध फवारणी करीत असल्याचे दिसून आले. सततच्या औषध फवारणीमुळे खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र, उत्पादन हाती आल्यानंतर हमीभाव मिळेल की नाही याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा मुबलक पाणी आणि बाजारात टिकून असलेले कांद्याचे दर शेतकºयांच्या चांगल्या प्रकारे जिव्हारी लागले असून, यंदा विक्र मी उन्हाळ कांद्याची लागवड केली जात आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई उद्भवत असल्याने डिसेंबर महिना अखेरपर्यंत उन्हाळ कांदा लागवड बोटावर मोजण्या इतक्याच शेतकºयांकडून केली जात होती. यंदा मात्र समाधानकारक पाऊस आणि त्यात आॅक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे.यंदा कांद्याचे दरदेखील गगनाला भिडल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात महागड्या दराने कांद्याची रोपे घेऊन उन्हाळ कांदा लागवड केली असून, अद्यापही पुढील पंधरा दिवस उन्हाळ कांदा लागवड सुरू राहणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. खरीप हंगामातील पिकापासून ते रब्बी हंगामातील पिकापर्यंत यंदाचे वातावरण हे शेतकºयांना डोकेदुखी आणि दैनंदिन व्यवहारात आर्थिक गणित कोलमडणारा ठरला आहे. खरीप हंगामातील पिके अवकाळी पावसाने वाहून गेल्यानंतर एक रु पयाचेदेखील उत्पादन शेतकºयांच्या पदरी पडलेले नसल्याने झालेला खर्चदेखील फिटला नसल्याने त्यात रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने ढगाळ वातावरण, धुके, दवबिंदू अशा वातावरणातील बदलांमुळे बळीराजा औषध फवारणीने त्रस्त झाला आहे. दरम्यान, मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर आदी परिसरात गव्हाच्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गहू पिकांवर माव्याचा प्रादुर्भावअनेक ठिकाणी गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्या आहे, परंतु ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी माव्याचा प्रादुर्भाव झाल्याने गहू पिकावर याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे मात्र मुबलक पाण्यामुळे यंदा हरभरा पिकाची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. अनेक ठिकाणी हरभरा पिकाला फुलकळ्या लागण्यास सुरु वात झाली असली तरी ढगाळ वातावरणामुळे मात्र या फुलकळ्या धोक्यात आल्या आहेत. रोगट वातावरणामुळे हरभºयाच्या झाडांवर अळीचे प्रमाण वाढत चालल्याने हरभरा पीक धोक्यात आले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती