भावमंदीमुळे शेतकरी निराशेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:30 IST2018-09-11T23:07:00+5:302018-09-12T00:30:17+5:30

पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे.

Farmers disappointed because of emotionalism | भावमंदीमुळे शेतकरी निराशेत

भावमंदीमुळे शेतकरी निराशेत

ठळक मुद्देपूर्व भागातील शेतकरी त्रस्तकांदा सडला, टमाटे फेकून द्यायची वेळ

शरदचंद्र खैरनार।
लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे : पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यामुळे चाळीतच कांदा सडल्यामुळे साधारणत: ३० टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला आहे.
सध्या पोळ कांद्याचा (पावसाळी कांदा) हंगाम सुरू झाल्याने त्यालाही फारसा भाव नसल्याने ८०० ते ९०० रुपये क्विंटलने कांदा विकला जात आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ कांद्याला शेतकºयांच्या अपेक्षेप्रमाणे भविष्यात जादा भाव मिळणार नाही, म्हणून शेतकरी आत्ताच पुरेसा पोळ कांदा मार्केटला येण्याच्या आत उन्हाळ कांदा नेण्याची लगबग करीत आहेत. उन्हाळ कांद्याला ३० टक्के घट असते; मात्र पोळकांद्याला घट नसते. तो ओला असल्याने वजनही चांगले भरते. त्यामुळे भाव आणखी खाली येण्याच्या आत उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटला येऊ लागला आहे.
तालुक्यात काही ठिकाणी नुकतीच कोबी, फ्लॉवरची लागवड करण्यात आली आहे. भेंडीची लागवड होऊन सुमारे तीन आठवडे झाले आहेत. भेंडीला पिवळी फुले बहरू लागली आहेत. आणखी १५ ते २० दिवसांनी भेंडी बाजारात येईल. भेंडीतच आंतरपीक म्हणून शेपूची भाजी व कोथिंबिरीची लागवड करण्यावर शेतकºयांनी भर दिला असून, शेपूला भाजी बाजारात १० रुपये प्रती जुडीचा भाव आहे. मेथी व पालकाचीही पेरणी सुमारे महिनाभरापूर्वी केली आहे. रासायनिक खतांचा वापर शेतकरी करू लागल्याने महिनाभरातच या भाज्या बाजारात येऊ लागल्या आहेत.

टमाटे उत्पादक नैराश्येत
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या पंचक्रोशीतील शेतकºयांनी सध्या टमाटे खुडण्याची कामे सुरू केली आहेत; परंतु टमाट्याच्या गडगडलेल्या भावामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. सुमारे ७० दिवसांपूर्वी लागवड केलेले टमाट्याचे पीक जोमाने बहरले असून, सुरुवातीला साधारण ७० ते १०० रुपये एका क्रेटला भाव मिळाला; परंतु नंतर टमाट्याचे भाव गडगडल्याने काही शेतकºयांनी जनावरांना टमाटे खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे.

खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांना
चांगला पोळ कांदा निवडीतून जो खराब कांदा शिल्लक राहतो तो १५० रुपये क्विंटलने किरकोळ व्यापारी खरेदी करतात व हाच कांदा शहरातील हॉटेलचालकांना त्यांंच्या मागणीनुसार पुरविला जातो. खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांना पुरवणारी एक साखळी बाजार समितीत कार्यरत असून, त्यांना हॉटेलचालकांचे सहकार्य असल्याने हा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे.

Web Title: Farmers disappointed because of emotionalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.