डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 18:28 IST2019-11-09T18:27:56+5:302019-11-09T18:28:55+5:30
सिन्नर तालुक्यातील डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने पिकांना जोरदार फटका दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून शासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर पंचनामा करण्यात येत आहे.

डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने शेतकरी हतबल
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने पिकांना जोरदार फटका दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून शासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर पंचनामा करण्यात येत आहे.
डुबेरे परिसरात कृषी विभागाच्या प्रतिनिधींकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेत पंचनामा करण्यात येत आहे. पश्चिम पट्ट्यातील कोनांबे, सोनांबे, सोनारी, जयप्रकाशनगर, डुबेरे या भागात पडलेल्या परतीच्या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी यांसह टोमॅटो, भाजीपाला पिकांना जोरदार तडाखा बसला आहे. द्राक्ष व डाळिंबबागा पूर्णपणे कोलमडून पडल्या आहेत. बागा ऐन फुलोºयात आल्या असताना परतीच्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे कर्जाचा डोंगर मात्र शेतकºयांच्या डोक्यावर तसाच आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून, हतबल झालेल्या शेतकºयांना मदत मिळावी म्हणून यंत्रणेकडून पंचनामे केले जात आहेत. शेतकºयांच्या नुकसानीचा फॉर्म भरून घेताना शेतात जाऊन जीपीएसद्वारे फोटो घेतले जात आहेत. डुबेरे परिसरात कृषी सहायक ए. बी. चौधरी शेतकºयांना मार्गदर्शन करून फॉर्म भरून घेत आहेत.
डुबेरे परिसरात बºयाच शेतकºयांचे परतीच्या पावसामुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. अद्याप काही भागातील शेतकºयांना नुकसानीचे फॉर्म भरण्याची माहिती नाही. नुकसानीचा फॉर्म भरून देण्यासह शासकीय मदतीपासून शेतकरी वंचित राहायला नको म्हणून मुदत वाढवावी, अशी मागणी सरपंच सविता वारुंगसे यांनी केली आहे.