चांदोरी परिसरातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:46 PM2019-12-27T23:46:49+5:302019-12-27T23:47:09+5:30

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून ...

Farmers in Chandori area suffer from changing weather | चांदोरी परिसरातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त

चांदोरी परिसरातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त

googlenewsNext

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून पिकांवर केलेल्या औषधांचाही उपयोग होत नसल्याने शेतकरी संकटात आहे.
चांदोरीसह परिसरात यंदा बºयापैकी पाऊस झाल्यामुळे खरिपाचे दमदार उत्पन्न निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या संकटातून शेतकºयांना सावरण्यासाठी सरकारने केवळ आठ हजार रु पये प्रति हेक्टरी अशी घोषणा केली तरी अनेक शेतकºयांना अद्याप मदतही मिळालेली नाही.
रब्बी हंगामातील कांदा, गहू, ज्वारी, तूर, भाजीपाला पिकांना थंडी पोषक असते, मात्र यंदा पाहिजे तशी कडाक्याची थंडी अद्याप पडलेली नाही. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वातावरणामुळे तुरीचा फुलोरा गळती होत असून, हरभरा व गव्हाचे पीक रोगराईच्या कचाट्यात सापडले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

Web Title: Farmers in Chandori area suffer from changing weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.