दिंडोरीच्या धान्य बाजाराकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:55 IST2020-03-29T17:54:14+5:302020-03-29T17:55:21+5:30
दिंडोरी : येथील बाजार समितीत भरणाºया धान्य बाजाराची सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांनानी बाजाराकडे पाठ फिरवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.

दिंडोरीच्या धान्य बाजाराकडे शेतकऱ्यांची पाठ
ठळक मुद्दे भाव मिळत असल्याने शेतकरी माल पुन्हा घरी घेऊन गेले.
दिंडोरी : येथील बाजार समितीत भरणाºया धान्य बाजाराची सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांनानी बाजाराकडे पाठ फिरवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.
बाजार समितीचे सचिव शिवाजी दातीर, विलास अपसुंदे, दिलीप सोमवंशी आदींनी बाजारासाठी जागा आखून देत सोशल डिस्टन्सि ठेवत बाजाराची सर्व तयारी केली होती. मात्र धान्याची अल्पशा आवक झाली. त्यातही गव्हाला अवघा १८०० भाव मिळत असल्याने शेतकरी माल पुन्हा घरी घेऊन गेले. चिंचेची खरेदी विक्र ी झाली. रविवारी धान्य बाजार सुरू राहणार असून शेतकºयांनी धान्य विक्र ीस आणावे असे आवाहन सचिव दातीर यांनी केले आहे. (फोटो २९ दिंडोरी)