कृषी विधेयकावरोधात ी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:39 IST2020-09-25T21:48:38+5:302020-09-26T00:39:41+5:30
दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जमिनीत गाडत सरकारचा निषेध केला.

कृषी विधेयकावरोधात ी शेतकरी आक्रमक
दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जमिनीत गाडत सरकारचा निषेध केला.
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रा.संदीप जगताप यांचे शेतात शेतक?्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मातीत गाडले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.नवीन कृषी विधेयक हे व्यापारी धाजिर्णे असून यामुळे शेतक?्यांची फसवणूक पिळवणूक होत शेतकरी देशोधडीला लागणार आहे.या कायद्यामुळे शेतक?्यांच्या मालाला योग्य भाव अचूक वजन मिळणार नाही शेतक?्यांची फसवणूक झाल्यास कुठेही दाद मागता येणार नसल्याने शेतकरी नाडला जाणार आहे तरी सरकारने त्वरित सदर विधेयक मागे घ्यावे राष्ट्रपती यांनी सदर विधेयकास मंजुरी देऊ नये असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संदीप जगताप यांनी केले यावेळी दत्ता सोनवणे ,शंकरराव संधान,नवनाथ जगताप,शंकर फुगट,विष्णु फुगट ,जयराम जगताप ,वैभव जगताप आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.
---------------------------
एकीकडे नियमन मुक्ती मग कांदा निर्यात बंदी कशी ? केंद्राच्या नव्या कृषी विधेयकाने कुठेही शेतमाल विकता येईल असे सांगत त्याचे समर्थन सत्ताधारी करतात मात्र संभाव्य फसवणुकीबद्दल काहीही बोलत नाही जर शेतमाल कुठंही विकता येईल असे म्हणता मग कांदा निर्यातबंदी कशी करता .सदर कायदा व्यापा?्यांचे चांगभलं करणारा तर शेतक?्यांचे नुकसान करणारा आहे तो त्वरित मागे घ्यावा.
-प्रा.संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना