कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:55 IST2020-01-06T00:55:03+5:302020-01-06T00:55:18+5:30
मालेगाव : जळकू येथील शेतकरी देवीदास रघुनाथ शिंदे (४२) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. देवीदास शिंदे यांच्यावर जळकू सोसायटीचे ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
मालेगाव : जळकू येथील शेतकरी देवीदास रघुनाथ शिंदे (४२) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. देवीदास शिंदे यांच्यावर जळकू सोसायटीचे मध्य मुदतीचे ४ लाखांचे व पीक कर्ज ८० हजार रुपये होते. तसेच अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती दीपक बागुल यांनी पोलिसांत दिल्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.